श्वेताताईंच्या विजयासाठी महायुतीतील घटक पक्ष एकवटले! शिवसेनेच्या बुथ प्रमुख व शाखाप्रमुखांची बैठक संपन्न; आमदार श्वेताताईंच्या विजयासाठी जीवाचे रान करू; शिवसैनिकांनी केला निर्धार.....

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ): राज्यातील महायुती सरकारने केलेल्या विकासकामांना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणाऱ्या कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले या पुन्हा एकदा महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून चिखली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. त्यांना मोठे जन समर्थन मिळत असल्याने श्वेताताईंचा विजय निश्चित आहे. या विजयामध्ये प्रत्येक शिवसैनिकाने आपले योगदान द्यावे असे आवाहन पक्षाचे जिल्हाप्रमुख ओमसिंह राजपूत यांनी केले. दि. १५ नोव्हेंबर रोजी शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप यांनी आयोजित केलेल्या पक्षाच्या बूथ प्रमुख व शाखाप्रमुखांच्या बैठकीस मार्गदर्शन करताना राजपूत बोलत होते. 

  येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान होत आहे. तत्पूर्वी महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या बूथ प्रमुख व शाखाप्रमुखांची बैठक शहर प्रमुख विलास घोलप यांनी आयोजित केली होती. या बैठकीमध्ये शहरातील प्रत्येक बुथवर महायुतीचा उमेदवार आ. श्वेताताई महाले यांना जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल या संदर्भात चर्चा व नियोजन करण्यात आले. पक्षाचे जिल्हाप्रमुख ओमसिंह राजपूत यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले. याप्रसंगी दत्ता खरात, नरेश राजपूत, बाजार समितीचे माजी संचालक गजानन पवार, माजी शहर प्रमुख श्रीकांत टेहरे, शहर संघटक राम देशमुख, युवा सेना शहर प्रमुख राजेश पवार, उपशहर प्रमुख विनोद वनारे, मनोज वाघमारे, रामेश्वर मेहत्रे, विक्रांत नकवाल, दीपक मगर, साहेबराव अंभोरे, अमोल सुसर, अमर काळे यांच्यासह सर्व बूथ प्रमुख व शाखाप्रमुख उपस्थित होते