EXCLUSIVE महाविकास आघाडीचे सर्व इच्छुक एका ठिकाणी! आ.धीरज लिंगाडे म्हणाले, तिकीट कुणालाही मिळो.....

 
Lungade
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाविकास आघाडीची आज बुलडाण्यात पत्रकार परिषद झाली. बुलडाणा शहरात उभारण्यात आलेल्या स्मारकाचे स्ट्रक्चरल ऑडिट, निमंत्रण पत्रिकेत करण्यात आलेला "सर्वजातीय महापुरुष" असा उल्लेख यासह विविध मुद्यांवर महाविकास आघाडीने सवाल उपस्थित केले. दरम्यान त्याआधी आ.धीरज लिंगाडे यांनी केलेल्या विधानामुळे पत्रकार परिषदेत हशा पिकला...

बुलडाणा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले जवळपास सर्वच नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. पत्रकार परिषदेची सुरूवात करतांना आ.धीरज लिंगाडे यांनी हाच धागा पकडत "आधीच सांगतो..महाविकास आघाडीचे सर्व इच्छुक इथे एकत्रित आहेत, त्यामुळे तिकीट कुणालाही मिळो, ज्याला मिळेल त्याचे काम आम्ही एकजुटीने करू.." असे विधान केले. यावेळी उपस्थित इच्छुक उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जयश्री शेळके, संजय राठोड, ॲड.विजय सावळे यांच्यासह सगळेच उपस्थित खळाळून हसले...