चित्रपट पाहून मध्यरात्री गावाकडे निघाले; अज्ञात वाहनाने चिरडले; उदयनगरच्या तिघा तरुणांचा मृत्यू... पल्सरने ट्रिपल सीट जात होते; अमडापुरच्या चौकात काळ आला होता..
Dec 14, 2024, 08:53 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली येथून चित्रपट पाहून गावाकडे निघालेल्या तीन तरुणांवर काळाने घाला घातला. १२ डिसेंबरच्या मध्यरात्री चिखली खामगाव महामार्गावर अमडापूर येथील चौकात भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चुलतभावांचा समावेश आहे. तिघांच्या मृत्यूने उदयनगर गावावर शोककळा पसरली आहे.
प्रतीक संजय भुजे (२५), प्रथमेश राजू भुजे (२६) व सौरभ विजय शर्मा (२४) अशी मृत तरुणांची नावे आहेत. यातील प्रतीक व प्रथमेश हे सख्खे चुलतभाऊ आहेत. दोघे भाऊ व त्यांचा मित्र सौरभ हे चिखली येथे रात्री चित्रपट पाहायला गेले होते. तेथून मध्यरात्री निघाले. दीडच्या सुमारास अमडापूरला पोहोचले. अमडापूर येथील टिपू सुलतान चौकात त्यांच्या दुचाकीलामागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की पल्सर दुचाकीचा चुराडा झाला आणि तिघेही फेकल्या जावून गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. धडक मारून अज्ञात वाहनचालकाने वाहनासह पलायन गेले. मोठा आवाज झाल्याने बाजूला एका पंक्चरच्या दुकानात झोपलेला तरूण जागी झाला. बाहेर येऊन त्याने अपघाताचे भयंकर दृश्य पाहताच तो प्रचंड हादरला. त्याने नागरिकांना माहिती दिली. तातडीने अमडापूर पोलीस पोहोचले. तसेच रुग्णवाहिकाही आली. चिखली येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.....