श्वेताताई आमदार झाल्यानंतर घानमोडी- मानमोडी ग्रामस्थांचे नशीबचं पालटले! २५ वर्षे जुना पुनर्वसनाचा प्रश्न श्वेताताईनी लावला मार्गी! म्हणून ग्रामस्थ म्हणतात, पुन्हा आमदार पाहिजे श्वेताताई...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):१९९९ पासून जवळपास २० वर्षे उलटली..मात्र या गावांचा प्रश्न प्रलंबितच.. अनेक लोकप्रतिनिधी आले आणि गेले मात्र या गावच्या समस्या "जैसे थे होत्या".. मात्र या गावांसाठी आशेचा किरण उगवला तो म्हणजे २०१९ मध्ये श्वेताताई महाले पाटील आमदार झाल्यानंतर.. होय..! ही गोष्ट आहे, चिखली विधानसभा मतदारसंघातील घानमोडी, मानमोडी या गावांच्या पुनर्वसनाची..! १९९९ पासून प्रलंबित असलेला या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आ. श्वेताताईंनी मार्गी लावला आहे..आज गावकऱ्यांची पुनर्वसन ई क्लास जमिनीवर झाली आहे. गावातल्या नाल्या, रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामेही प्रगतीपथावर आहेत...त्यामुळे या गावकऱ्यांनी पुन्हा एकदा श्वेताताईच आमदार पाहिजेत अशा भावना बोलून दाखवल्या आहेत..

  १९९९ पासून घानमोडी, मानमोडी ही गावे पेनटाकळी प्रकल्प बाधित होती. अनेक वर्षांपासून या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न शासन दरबारी रखडलेला होता. श्वेताताई महाले आमदार झाल्यानंतर त्यांनी या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवला.. शासन दरबारी जोरदार पाठपुरावा केला, ताईंच्या या प्रयत्नांमुळे आता गावकऱ्यांना न्याय मिळाला आहे.प्राथमिक सोयी, सुविधा उपलब्ध झाल्याने गावकरी समाधान व्यक्त करत आहेत. 


या गावांमधील पुनर्वसनाची योजना १९९९ पासूनच अडकलेली होती. निधीचा अभाव, भूमी संपादनातील अडचणी, प्रशासकीय अडचणी या कारणांमुळे ही योजना पूर्ण होऊ शकली नव्हती. यामुळे या गावांतील रहिवासी अनेक वर्षांपासून असुरक्षित आणि अस्थिर स्थितीत राहात होते. त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता.


आता हा प्रश्न मार्गी लागल्याने
गावकऱ्यांना स्वतःचे  हक्काचे घर मिळेल. त्यांच्या जीवनस्तरात सुधारणा होईल आणि ते सुरक्षितपणे राहू शकतील. या योजनेमुळे या गावांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. त्यादृष्टीने निधी मंजूर झाल्यामुळे पुनर्वसन योजनेचे काम देखील सुरू झाले आहे.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मिळून काम करणार आहेत. या योजनेच्या कामात कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. आ. श्वेताताईंच्या प्रयत्नांमुळे पेनटाकळी पुनर्वसन योजना मार्गी लागली, हे निश्चितच एक मोठे यश आहे. या योजनेमुळे अनेक कुटुंबांचे जीवन बदलणार आहे.