एकसंघ काँग्रेस जोशात उभी राहिली जयश्रीताईच्या पाठीशी! माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ व लिंगाडे यांच्या आक्रमक भाषणाची एकच चर्चा...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जयश्रीताई शेळके यांच्या प्रचार सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे काल उपस्थित होते.कालची जंगी सभा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जेवढी चर्चा सभेच्या नीटनेटक्या आयोजन नियोजनाची झाली त्यापेक्षा अधिक चर्चा आमदार हर्षवर्धन सपकाळ ,धीरज लिंगडे यांनी केलेल्या रोखठोक भाषणाची देखील होत आहे. आक्रमकपणे हे दोन्ही शिलेदार काल ताईंसाठी मैदानात उतरल्याचे चित्र दिसून आले. हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील बुलढाणा साठी उमेदवारी मागितली होती. परंतु ही जागा शिवसेनेला देण्यात आल्याने ते नाराज आहेत असे बोलले जात होते. मात्र काल त्यांनी केलेल्या रोखठोक भाषणाने या सर्व मुद्द्यांचे खंडन झाले असून काँग्रेस एक संघपणे जयश्रीताई म्हणजे जयश्रीताई अशा भूमिकेने उतरल्याच दिसून आले.

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्या प्रचारासाठी बुलढाणा शहरात काल 8 नोव्हेंबर रोजी पार पडलेली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा  शिवसेना (उबाठा) आणि महाविकास  आघाडीचे जंगी शक्तिप्रदर्शन ठरली. या सभेला शिवसेनासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटल्याचे दिसून आले. यामध्ये ज्येष्ठ नेते धृपदराव सावळे, गणेश पाटील ते पंचायत राज समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार धीरज लिंगाडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, विजय अंभोरे, विजय सावळे , सुनील सपकाळ, सतीश मेहेंद्रे, तुळशीराम नाईक, दत्ता काकस आदि काँग्रेसचे झाडून सर्व नेते उपस्थित होते.यापूर्वी जिल्हा काँग्रेसचे 'बिग बॉस'  मुकुल वासनिक यांनी जयश्री ताईंच्या उमेदवारी अर्ज भरताना आवर्जून उपस्थित राहिले.  त्यांनी नावातच जय असलेल्या जयश्री ताईंना विजयाचा आशीर्वाद दिला. यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या सभेला काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी हजेरी लावत 'हम साथ साथ है' ची प्रचिती दिली.

यावेळी बुलढाण्याचे माजी आमदार  हर्षवर्धन सपकाळ आणि विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे यांनी केलेल्या  रोखठोक  आक्रमक भाषणांनी काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये जोश आणि उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले. या दिग्गज नेत्यानी यावेळी बोलताना
बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर जहाल टीका आणि आरोपांची तोफ डागली.  बुलढाणा मतदारसंघात गत पाच वर्षात असलेली दहशत, मनमानी कारभार, कमरे खालच्या भाषेत गलिच्छ  भाषेतील धमक्यांचे  सत्र, दादागिरी यावर दोघांनी निर्भयपणे टीका केली. बुलढाणा मतदारसंघातील हुकूमशाही, दबंगगिरी विरुद्ध लोकशाही, संस्कृती विरुद्ध विकृती, असा बुलढाणा मतदारसंघातील लढा असल्याचे सांगितले. ही दहशत, विकृती कायमची हद्धपार करण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचा।निर्धार सपकाळ आणि लिंगाडे यांनी बोलून दाखविला.या नेत्यांसह काँग्रेसच्या पाठबळाचे ,एकजुटीचे त्यांनी भरभरून कौतुक केले. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून ते जोशाने प्रचाराला भिडले असल्याचे चित्र आहे.