सिंदखेडराजात उसळली भगवी लाट! आक्रोश मोर्चाने शहर दणाणले; नरेंद्र खेडेकर म्हणाले, विधानसभेवर भगवा फडकवा! जिल्हाप्रमुख बुधवतांनी सरकारला आडव्या हाताने घेतले! दिलीप वाघ यांच्या आयोजनाचे कौतुक.....
राज्यात उद्योगपतींचे सरकार आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफ करायला सरकार जवळ पैसे नाही मात्र उद्योगपतींचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. गद्दार आमदारांना खोके देण्यासाठी सरकारकडे पैसे आहे मात्र अतिवृष्टीची नुकसान भरपाई अजून शेतकऱ्यांना मिळत नाही असा घणाघात नरेंद्र खेडेकर यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणारच, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघावरही भगवा फडकला पाहिजे त्यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन नरेंद्र खेडेकर यांनी केले. राज्यातील सरकार असंवेदनशील असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे या सरकारला काही फरक पडत नसल्याचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत म्हणाले. शेतकऱ्यांची कर्जमाफी केवळ महाविकास आघाडी सरकारच करू शकते असेही श्री.बुधवंत म्हणाले. यावेळी बुधवंत यांनी दिलीप वाघ यांच्या नियोजनाचे कौतुक केले. सह संपर्कप्रमुख छगन मेहेत्रे यांनी ३० वर्षात सिंदखेडराजा मतदारसंघातून विकास गायब असल्याचा आरोप केला.