प्रतापगडात घोंगावले भगवे वादळ! डॉ.संजय रायमुलकर विजयी चौकार मारणारच; केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधवांचे प्रतिपादन;
हजारोंच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज; आमदार रायमुलकर म्हणाले, मायबाप जनता हाच माझा परिवार....
Oct 24, 2024, 19:27 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सामान्य शिवसैनिक, शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख ते आमदार अशी यशाची चढती कमान लाभलेले मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर हे यंदा चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मताधिक्याचा विजयी विक्रम साधत असताना विनम्र आणि संयमी स्वभावाने प्रत्येकाला आपलंसं करणार हे व्यक्तिमत्व पुन्हा एकदा जनमानसाच्या पसंतीला उतरत असल्याचे चित्र आज, २४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरतेवेळी मेहकर शहरात दिसले.मेहकर शहर आज पूर्ण भगवे झाले होते.ऐतिहासिक स्वातंत्र्य मैदानात झालेली सभा तर विरोधकांच्या उरात धडकी भरवणारी ठरली. आ.डॉ.संजय रायमुलकर विक्रमी मताधिक्याने विजयाचा चौकार मारणारच असा विश्वास यावेळी केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. यावेळी टाळ्यांचा झालेला गजर उपस्थित गर्दीच्या मनात काय आहे हे सांगून गेला.महायुतीच्या वतीने आज प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मेहकर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार डॉ.संजय रायमुलकर यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कडे दाखल केला. त्यानंतर शिवसेना कार्यालयापासून हजारो नागरिकांच्या सहभागात निघालेली रॅली वाटिका चौक ,लोणार वेस, मुख्य बाजारपेठ या मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून स्वातंत्र्य मैदानावर आली. रॅलीमध्ये हजारो महिला व पंधरा गावची भजनी मंडळी सुद्धा सहभागी झाली होती. मंत्री प्रतापरावजी जाधव व आमदार संजय रायमुलकर हे सुशोभित केलेल्या बैलगाडीवर विराजमान होते. शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय असो अशा घोषणांच्या निनादाने मेहकर शहर दणाणून गेले होते...
यावेळी झालेल्या सभेत पुढे बोलताना ना.जाधव म्हणाले की, एक रुपयात पिकविमा मुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला असून किसान सन्मान निधीच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना केंद्र व राज्य पैसे देत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा सन्मान वाढविला गेला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून दिला आहे. म्हणून लोकांच्या भल्यासाठी लोकांनी महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजय करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
गर्व से कहो हम हिंदू है..
आपल्या घणाघाती भाषणात प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे गर्वसे कहो हम हिंदू है असे म्हणायचे, पण आता उबाठाची पूर्ण काँग्रेस झालेली असल्यामुळे आणि ते काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले असल्यामुळे गर्वसे कहो, असे उद्धव ठाकरे म्हणू शकत नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. महायुती सरकारने जनहिताच्या योजनांच्या माध्यमातून लोकांचा मोठा फायदा करून दिलेला असल्यामुळे या कामांची जाणीव कार्यकर्त्यांनी लोकांना घरोघर जाऊन करून देणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले..
मायबाप जनता हाच माझा परिवार: आ. रायमुलकर..
यावेळी भाषण करताना उपस्थित मोठा जनसमुदाय पाहून आमदार संजय रायमुलकर भावनाविवश झाले होते. मायबाप जनता हाच माझा परिवार आहे .त्यांना दैवत मानून मी त्यांच्या सेवेत अहोरात्र कार्यरत आहे. मोठ्या प्रमाणात विकास कामेही झालेली आहेत. हा विकासरथ पुढे न्यायचा आहे .म्हणून जनतेने धनुष्यबाण चिन्हाला मत देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करावे ,असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवसेनेचे बाजार समिती सभापती माधवराव जाधव, जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव ,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मायाताई मस्के , वैशालीताई सावजी
,राजश्रीताई जाधव ,राजेंद्र गाडेकर, तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळूकर, भगवानराव सुलताने, युवासेनेचे भूषण घोडे ,शहर प्रमुख जयचंद बाटिया ,पांडुरंग सरकटे, भारतीय जनता पक्षाचे प्रल्हाद अण्णा लष्कर, जिल्हा उपाध्यक्ष बलदेवराव चोपडे, अर्जुनराव वानखेडे, विजय मापारी, ठोकळ महाराज, अक्षय दीक्षित, सारंग माळेक राष्ट्रवादी काँग्रेसचे गिरीधर पाटील, गजानन सावंत, त्याचप्रमाणे बबनराव तुपे ,बबनराव भोसले ,राजेंद्र पळसकर, रामराव म्हस्के, डॉ. केशव अवचार, दत्ता खरात, विजय सानप ,डॉ. काशिनाथ घुगे ,संतोषराव देशमुख, सुमनताई तायडे ,हर्षल कुसळकर, कैलास चौरे, हर्षल गायकवाड, भास्करराव राऊत ,अशोक वारे, उदय सावजी, राजू मुंदडा, ललित इन्नानी ,समाधान साठे, मनोज जाधव, मंगेश तट्टे ,समाधान सास्ते ,पिंटू सर्जन, ओम सौभागे, माधव तायडे, संतोष चनखोरे, तौफिक कुरेशी, समाधान साबळे ,भास्करराव राऊत ,रविराज रहाटे, माधवराव आरसोडे ,पंजाबराव इंगळे ,खंडू सवडतकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी राजेंद्र गाडेकर, बलदेवराव चोपडे, गिरधर पाटील, चैतन्य महाराज, बळीराम मापारी यांचेही भाषणे झाली.
वंचित उमेदवाराच्या परिवाराचा शिवसेनेत प्रवेश
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार ऋतुजा चव्हाण यांच्या सासू निशाताई चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयचंद बाठिया यांनी केले.