आश्वासक चेहरा..नेतृत्वाला धार! डॉ.ऋतुजा चव्हाण वाटतात सर्वसामान्यांना आधार! प्रचार दौऱ्याला उदंड प्रतिसाद! डॉ. टाले म्हणाले, गुलाल आपलाच.....

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर - लोणार मतदारसंघाला आता खऱ्या अर्थाने विकासाचे व्हिजन असणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. संवेदनशील नेतृत्वाची गरज आहे..आतापर्यंत मेहकर मतदारसंघात विकास झालाच नाही.. मेहकर विधानसभा मतदारसंघ विकासापासून दूर आहे. विधानसभेत देखील इथल्या मतदारसंघातील प्रश्नांवर कधी चर्चा होत नाही. त्यामुळे आता सामान्यांच्या हक्कांसाठी भांडणारे, सर्वमान्य आणि सर्व-सामन्यांतील नेतृत्व असलेले डॉ.ऋतुजा चव्हाण यांना आपल्याला विधानसभेत पाठवायचे आहे. २३ नोव्हेंबरला गुलाल आपलाच आहे..फक्त गाफील न राहता कामाला लागा असे प्रतिपादन शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी केले. आज,६ नोव्हेंबरला डॉ.ऋतुजा टाले यांच्या प्रचार दौऱ्याला मादणी, आरेगाव, जवळा, हिवरा साबळे या गावांत उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधतांना डॉ. टाले बोलत होते..

यावेळी पुढे बोलतांना डॉ. टाले म्हणाले की, ऋतुजा चव्हाण या आपल्या हक्काच्या बहीण आहेत. आता आपल्या लाडक्या बहिणीला सभागृहात पाठवण्याची जबाबदारी आपली आहे. ऋतुजा चव्हाण आमदार म्हणजे तुम्ही आम्ही सर्व आमदार असेही डॉ. टाले म्हणाले.
   तुमचा विश्वास सार्थ ठरवेन..
मी राजकारण करण्यासाठी नव्हे तर विकासकारण करण्यासाठी राजकारणात आलेले आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे हे माझे ध्येय आहे. मेहकर आणि लोणारची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे, तुम्ही मला साथ द्या..तुमचा विश्वास मी सार्थ ठरवेन असे डॉ.ऋतुजा चव्हाण म्हणाल्या...