Amazon Ad

आत्मविश्वासाने भरलेली समर्थकांची गर्दी आणि प्रचंड उत्साह! आ. श्वेताताई महाले यांनी फोडला प्रचाराचा नारळ...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):सलग दुसऱ्यांदा चिखली विधानसभा मतदारसंघात कमळ फुलवण्याचा दुर्दम्य आत्मविश्वास मनात बाळगलेले नेते, कार्यकर्ते व समर्थकांची गर्दी व त्यांचा उत्साह अशा वातावरणात महायुतीतर्फे भाजपच्या उमेदवार आ. श्वेताताई महाले यांनी दि. २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृताच्या योगावर श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन व महाआरती करून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर आ. महाले यांनी आपल्या समर्थकांसह शहरातून भव्य प्रचार फेरी काढत मतदारांशी संपर्क साधला. यावेळी चिखलीकरांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 
 
 
                
   महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या ९९ उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली. या पहिल्याच यादीत चिखली मतदारसंघातून आ. श्वेताताई महाले यांना पुन्हा संधी देण्यात आली. श्वेताताईंना उमेदवारी दिल्यानंतर चिखली मतदारसंघातील भाजपाचे कार्यकर्ते व मतदारांनी त्यांचे या घोषणेचे जल्लोषात स्वागत केले. आज गुरुपुष्यामृत योगावर ग्रामदेवता श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन देवीला पातळ अर्पण करून व महाआरती करून आ. श्वेताताई महाले यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. श्री रेणुका देवीच्या मंदिरात यावेळी भारतीय जनता पक्षासह महायुतीचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ, सुरेशआप्पा खबुतरे, डॉ. प्रतापसिंह राजपूत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, जिल्हा सचिव दीपक काळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे, शेखर बोंद्रे, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, एड. मंगेश व्यवहारे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात, सलीम मेमन, माजी नगराध्यक्षा विमलताई देव्हडे, प्रशांत एकडे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रेमराज भाला, दत्ता खरात, माजी प्राचार्य विष्णुदत्त त्रिवेदी, रेणुका देवी संस्थानचे उपाध्यक्ष गोपाल शेटे, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनीस, सुभाषआप्पा झगडे, विजय खरात शैलेश बाहेती, गोविंद देव्हडे, प्रशांत देशमुख, श्याम वाकदकर, नामू गुरुदासानी, सुभाष खरात, सलीम परवेज, सागर पुरोहित, विजय तिवारी, अर्चनाताई खबुतरे हनीफ हाजी, दत्ता सुसर, अमोल शेटे, महेश लोणकर, शेख करामात, युवराज भुसारी, संजय अतार, विजय वाळेकर, चेतन देशमुख, अजय कोठारी, विजय खरे, शिवाजी शिराळे, वीरेंद्र वानखेडे, सागर खरात, शेख नज्जू, विकी हरपळे, शिवा इंगळे, शैलेश देशमुख, योगेश झगडे यांच्यासह महायुती मधील घटक पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आजी-माजी नगरसेवक, भारतीय जनता पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली होती. 
    प्रचार रॅलीला चिखलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
             श्री रेणुका देवी मंदिरातून निघालेली प्रचार फेरी राजा टॉवर जयस्तंभ चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक डीपी रोड या मार्गाने बाबुराव चौकापर्यंत गेली. यादरम्यान आ. श्वेताताई महाले यांनी मतदारांना अभिवादन केले. आ. श्वेताताई महाले यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या पुस्तिकेचे या रॅली दरम्यान वितरण करण्यात आले. नागरिकांनी देखील श्वेताताईंना उस्फूर्त प्रतिसाद या प्रचार रॅली मधून दिला.
    २८ ऑक्टोबरला श्वेताताई भरणार उमेदवारी अर्ज
  उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज प्रचाराचा नारळ आ. श्वेताताई महाले यांनी फोडला असून येत्या २८ ऑक्टोबर रोजी त्या आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. या निमित्त खामगाव चौफुली पासून सकाळी ११ वाजता महायुतीचे प्रचंड शक्ती प्रदर्शन करणारी रॅली आयोजित केली असून बस स्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौक या मार्गे ही रॅली राजा टावर येथे पोहोचल्यानंतर तेथे सदर रॅलीचे सभेमध्ये रूपांतर होईल. या रॅलीसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रयत क्रांती संघटना आदी महायुती मधील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.