498 ग्रामपंचायतींच्या 3891 जागांसाठी कांटे की टक्कर!; प्रचाराची रणधुमाळी शिगेला!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामीण भागातील टोकाच्या राजकारणातही बिनविरोध निवड झाल्याचा राजकीय चमत्कार झाल्याने आता 15 जानेवारीला प्रत्यक्षात 498 ग्रामपंचायतींसाठीच मतदान होऊ घातले आहे. मात्र याउप्परही 3891 जागांसाठी काट्याच्या व चुरशीच्या लढती रंगल्या आहेत. यामुळे प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. यापूर्वी जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र 28 …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामीण भागातील टोकाच्या राजकारणातही बिनविरोध निवड झाल्याचा राजकीय चमत्कार झाल्याने आता 15 जानेवारीला प्रत्यक्षात 498 ग्रामपंचायतींसाठीच मतदान होऊ घातले आहे. मात्र याउप्परही 3891 जागांसाठी काट्याच्या व चुरशीच्या लढती रंगल्या आहेत. यामुळे प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे.

यापूर्वी जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र 28 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तब्बल 885 सदस्य बिनविरोध निवडून आले तर 29 जागा रिक्त राहिल्या. यामुळे आता 3891 जागांसाठी निकराचा रणसंग्राम रंगला आहे. यामुळे प्रचाराच्या तोफा थंड होण्यासाठी काहीच तास उरल्याने साम, दाम, दंड, भेद या धर्तीवर होणारा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आता प्रत्यक्षात 498 ग्रामपंचायतींसाठी 1795 मतदान केंद्रांवरून 15 जानेवारीला सकाळी 7ः30 ते संध्याकाळी 5ः30 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, आरडीसी दिनेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 6 एसडीओ, 13 तहसीलदार, निवडणूक कक्षाचे नायब तहसीलदार सुनील आहेर, अव्वल कारकून राम जाधव, नितीन बढे, नागोराव खरात, विजय सनिसे यांच्या नियोजनानुसार 13 तहसीलमधील शेकडो कर्मचारी, अधिकारी, सातत्याने परिश्रम घेत आहेत.