सिंदखेडराजात ३७ जणांचे ४९ अर्ज! बंडखोरांचा धुमाकूळ; महायुतीच नव्हे तर महाविकास आघाडीलाही बंडोबांचा झटका; काँग्रेसच्या अशोक पडघानांनी देखील भरला अर्ज...
Oct 30, 2024, 12:52 IST
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा मतदारसंघात अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत घोळच घोळ सुरू होता..तो घोळ अद्यापही कायम आहे..डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार गटात जाण्यासाठी घेतलेला वेळ महायुतीच्या इच्छुकांना गोंधळात टाकणारा ठरला..आता अखेर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३७ जणांनी ४९ अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक बंडखोर महायुतीत आहेत तर काही प्रमाणात महाविकास आघाडीला देखील बंडखोरीचा सामना करावाच लागणार आहे..अर्थात ४ नोव्हेंबर पर्यंत कुणाचे बंड होते थंड हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे..त्यानंतर मुख्य लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
अर्ज भरण्यात सर्वात आधी आघाडी घेतली ती महाविकास आघाडीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी...मात्र महायुतीकडून कोण? असा प्रश्न बरेच दिवस चर्चेत होता. २८ ऑक्टोबरच्या सायंकाळी शिवसेना शिंदे गटाने डॉ.शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी जाहीर केली. काल त्यांनी अर्ज देखील भरला..मात्र दुसऱ्या बाजूला त्याच वेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील काँग्रेसच्या मनोज कायदेंना आपल्याकडे घेऊन त्यांच्यासाठी एबी फॉर्म देखील आणला, त्यामुळे आता इथे महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होते की डॉ.खेडेकर आणि मनोज कायंदे यांच्यापैकी एकाला अर्ज मागे घ्यावा लागतो हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. महायुतीचा आणखी एक मित्र पक्ष असलेल्या रिपाई (कवाडे) गटाकडून भाई विजय गवई यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेले डॉ.सुनील कायंदे, सूरज हनुमंते, अंकुर देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मागील निवडणुकीत ३९ हजार ८७५ मते घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या सविता मुंडे यांनी यावेळी पुन्हा वंचित कडून उमेदवारी दाखल केला आहे. काँग्रेस नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोकराव पडघान यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या पुतणी गायत्री शिंगणे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.एकूण ३७ उमेदवारांकडून ४९ अर्ज दाखल झाले आहेत, मुख्य लढत ४ नोव्हेंबर नंतर स्पष्ट होईल....