“भाजयुमो’च्या शेगाव शहराध्यक्षपदी विजय लांजुळकार

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी विजय लांजुळकार यांची निवड झाली आहे. माजी मंत्री, आमदार डॉ. संजय कुटे यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती झाली. लवकरच नगरपालिका निवडणूक असून, पक्षवाढीसाठी श्री. लांजुळकार यांना डॉ. कुटे यांनी शुभेच्छा दिल्या. प्रभाग चारमधील पंचशीलनगर, पटवारी कॉलनी, व्यंकटेशनगर येथील सामान्य जनतेसोबत अतिशय दांडगा संपर्क …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भारतीय जनता युवा मोर्चाच्‍या शहराध्यक्षपदी विजय लांजुळकार यांची निवड झाली आहे. माजी मंत्री, आमदार डॉ. संजय कुटे यांच्या उपस्थितीत ही नियुक्‍ती झाली.

लवकरच नगरपालिका निवडणूक असून, पक्षवाढीसाठी श्री. लांजुळकार यांना डॉ. कुटे यांनी शुभेच्‍छा दिल्या. प्रभाग चारमधील पंचशीलनगर, पटवारी कॉलनी, व्यंकटेशनगर येथील सामान्य जनतेसोबत अतिशय दांडगा संपर्क श्री. लांजुळकार यांचा आहे. त्यामुळे कदाचित उमेदवारीची माळही त्यांच्या गळ्यात पडू शकते. यावेळी गटनेते शरदसेठ अग्रवाल, भाजप शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, पांडुभाऊ बुच, राजेश अग्रवाल, राजेंद्र भिसे, कमलाकर चव्हाण, रोहित धाराशिवकर, अॅड. प्रविण पल्हाडे, गणेश शेळके, नंदुभाऊ शेगोकार, सचिन माळी, विठ्ठल दही, शंकर निळे, महादेव घाटोळ, आनंद झाडोलिया, प्रशांत पवार, भरत घाटोळ, सुरेश तळपते, गोपाल नेरकर, विनोद शेगोकार, सोनू मोहोड आदी उपस्‍थित होते.