हुश्शऽऽ… झाले बुवा मतदान!! 76 टक्क्यांच्या आसपास मतदानाचा अंदाज!; जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार नाही

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज 15 जानेवारीच्या मुहूर्तावर झालेल्या मतदानात ग्रामीण मतदारांचा उत्साह दिसून आला. शहरी मतदारांच्या तुलनेत ग्रामस्थ मतदानाबद्दल किती संवेदनशील व जागृत राहतात, हे आजच्या मतदानाने पुन्हा एकवार सिद्ध केले. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात 75 ते 80 टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाल्याचा व्यापक अंदाज आहे. अंतिम आकडेवारी …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज 15 जानेवारीच्या मुहूर्तावर झालेल्या मतदानात ग्रामीण मतदारांचा उत्साह दिसून आला. शहरी मतदारांच्या तुलनेत ग्रामस्थ मतदानाबद्दल किती संवेदनशील व जागृत राहतात, हे आजच्या मतदानाने पुन्हा एकवार सिद्ध केले.

प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात 75 ते 80 टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाल्याचा व्यापक अंदाज आहे. अंतिम आकडेवारी मध्यरात्रीपर्यंत स्पष्ट होणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी बुलडाणा लाईव्हशी बोलताना सांगितले. आज सकाळी 7ः30 वाजता 1796 मतदान केंद्रांवर मतदानास प्रारंभ झाला. सकाळचे 2 तास वगळता मतदानाची गती उत्तरोत्तर वाढतच गेली. दुपारी 3ः30 वाजेपर्यंतच मतदानाची टक्केवारी 64 टक्क्यांच्या घरात पोहोचली. यानंतर अखेरच्या टप्प्यात मतदान केंद्रांना अक्षरशः मतदारांचा गराडा पडल्याचे दिसून आले. शेवटच्या 2 तासांत मतदानात 13 ते 17 टक्के दरम्यान वाढ झाल्याने आकडा 75 टक्क्यांच्या पल्याड गेल्याचा अंदाज आहे.

तालुकानिहाय अंदाजित मतदान टक्केवारी

 • बुलडाणा ः 70 टक्के
 • चिखली ः 80 टक्के
 • देऊळगाव राजा ः 79.10 टक्के
 • सिंदखेड राजा ः 74,34 टक्के
 • मेहकर ः 80,29 टक्के
 • लोणार ः 80.38 टक्के
 • खामगाव ः 76 टक्के
 • शेगाव ः 81.11 टक्के
 • जळगाव जामोद ः 72. 89 टक्के
 • संग्रामपूर ः 74.17 टक्के
 • मलकापूर ः 81.03 टक्के
 • नांदुरा ः 79.29 टक्के
 • मोताळा ः 73.44 टक्के
 • एकूण ः 76.27 टक्के

शतकवीर महिलेने मतदान करत सर्वांना केले थक्क

चिखली तालुक्यातील केळवद येथील 105 वर्षीय महिलेने मतदान करून इतरांसमोर एक आदर्श ठेवला. जनाबाई नारायण आखाडे असे या शतकवीर महिलेचे नाव आहे. त्यांनी केळवद येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळेत मतदान केले. या मतदानाची केळवदच नव्हे संपूर्ण चिखली तालुक्यात चर्चा होत आहे.