संग्रामपूर बाजार समितीवर प्रशासक; शांताराम दाणे झाले मुख्य प्रशासक
संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्य शासनाने आज, २४ ऑगस्टला प्रशासकांची नियुक्ती केली आहे. तसे पत्र जिल्हा उपनिबंधकांना प्राप्त झाले असून, मुख्य प्रशासक म्हणून शांताराम दाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासकांमध्ये रवींद्र झाडोकार, जनार्दन गाळकर, रमेश चिपडे, जगन्नाथ मिसाळ, अजय घट्टे, विरेंद्र झाडोकार, विलास मोरखडे, विश्वासराव डोसे, दिलीप देशमुख, नारायण ढगे, तुकाराम घाटे, बळीराम धुळे, सतीश चोपडे, शेख अफसर अकबर कुरेशी, रमेश लोणकर, डॉ. जानराव सातव, जयमाल भयडया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व व्यक्ती प्रशासकीय मंडळावर नियुक्त होण्यास पात्र आहेत की नाही याची खात्री जिल्हा उपनिबंधकांना करून घेण्यास सांगितले असून, ज्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत त्यांची नियुक्ती न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून शासनाकडून मान्यता दिली गेली आहे. राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी हा आदेश काढला आहे.