शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार!; पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्‍या “प्रॉमिस’च्‍या पूर्ततेकडे शेतकऱ्यांचे डोळे!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उरलेसुरले पीकही कालपासून सुरू असलेल्या पावसाने नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी भांबावला आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मलकापूर पांग्रा (ता. सिंदखेड राजा) येथे परवा दिलेल्या भेटीत शेतकऱ्यांना दिलेल्या “प्रॉमिस’ची आता प्रकर्षाने गरज निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे मदत पॅकेज देण्यात येत असून, शेतकऱ्यांना सरसकट …
 
शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार!; पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्‍या “प्रॉमिस’च्‍या पूर्ततेकडे शेतकऱ्यांचे डोळे!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उरलेसुरले पीकही कालपासून सुरू असलेल्या पावसाने नष्ट होण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे शेतकरी भांबावला आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मलकापूर पांग्रा (ता. सिंदखेड राजा) येथे परवा दिलेल्या भेटीत शेतकऱ्यांना दिलेल्या “प्रॉमिस’ची आता प्रकर्षाने गरज निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे मदत पॅकेज देण्यात येत असून, शेतकऱ्यांना सरसकट मदत करू, असे डॉ. शिंगणे म्‍हणाले होते.

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी “बुलडाणा लाइव्ह’ने सातत्‍याने वृत्त प्रसिद्ध केले. लोकप्रतिनिधींनीही आग्रही मागणी केली. त्‍यामुळे सरकारच्‍या धोरणात बदल होत असल्याचे दिसून येत आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे कुठलाही पंचनामा न करता वेळप्रसंगी निकषांमध्ये बदल करून या शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात येईल. जिल्ह्यात मंडळाच्या ठिकाणीच पर्जन्यमापक यंत्र आहे. त्यामुळे पाऊस या शेतात पडला आणि शेजारील शेतात पडला नाही अशी परिस्थिती येथे बघायला मिळाली आहे.

पावसाची नोंद बरोबर होत नसल्याने शेतकऱ्यांना मदत मिळण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात येतील, असेही पालकमंत्र्यांनी म्‍हटले आहे. मलकापूर पांग्रा परिसरातील शेतकऱ्यांशी डॉ. शिंगणे यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांना सरसकट मदत तात्काळ मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल, असे ते म्‍हणाले.