राणेंना जामीन… चिखलीत भाजपने फोडले फटाके!
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन केले. राणे यांना जामीन मंजूर होताच याच कार्यकर्त्यांनी नंतर जल्लोष केला. आज, २५ ऑगस्ट रोजी चिखलीत भाजपतर्फे आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडले.
यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, सुहास शेटे, संजय महाले, संतोष काळे पाटील, सागर पुरोहित, विनोद सीताफळे, नगरसेवक सुभाष आप्पा झगडे,गोविंद देव्हडे, सुदर्शन खरात, संजय अतार, किशोर जामदार, सचिन कोकाटे, अंकुश तायडे, ॲड. संजय सदार, विजय वाळेकर, सिद्धेश्वर ठेंग, विजय खरे, युवराज भुसारी, गणेश यंगड, रमेश सोळंकी, रमेश अकाळ, गोपाल शेळके, शैलेश सोनुने, गजानन दुधाळे, बद्री पानगोळे, गजानन सोळंकी, भारत सोळंकी, शंकर रुद्ररकर, गजानन देशमुख, दिगंबर जाधव, नरेंद्र मोरवाल, अक्षय भालेराव, शिवा भागवत, अशोक हतागळे, गजानन काळे, दीपक भाकडे, वासुदेव राजपूत, श्याम दिवटे, संदीप लोखंडे, आत्माराम मोरे, सिद्धेश्वर मोरे,दत्ता इंगळे, कयूम शहा, भीमराव अंभोरे, आमदार श्वेताताई महाले यांचे स्वीय सहायक सुरेश इंगळे पाटील, अरुण पाटील, ईश्वर गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.