राणेंच्‍या पोस्‍टरला चपलांचा मार!; बुलडाण्यात शिवसेना आक्रमक; राजीनाम्याची मागणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याबद्दल केलेल्या विधानामुळे शिवसेनेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी हिशोब चुकता करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर बुलडाणा युवा सेनेतर्फे आज, २४ ऑगस्टला दुपारी राणे यांच्या पोस्टरला चपलांचा मार देऊन पोस्टर लाथाबुक्यांनी तुडविण्यात आले. आमदार संजय गायकवाड यांचे चिरंजीव …
 
राणेंच्‍या पोस्‍टरला चपलांचा मार!; बुलडाण्यात शिवसेना आक्रमक; राजीनाम्याची मागणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याबद्दल केलेल्या विधानामुळे शिवसेनेतून संतप्‍त प्रतिक्रिया उमटत आहे. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी हिशोब चुकता करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर बुलडाणा युवा सेनेतर्फे आज, २४ ऑगस्‍टला दुपारी राणे यांच्या पोस्टरला चपलांचा मार देऊन पोस्टर लाथाबुक्यांनी तुडविण्यात आले.

आमदार संजय गायकवाड यांचे चिरंजीव कुणाल गायकवाड यांच्या नेतृत्वात बुलडाण्यातील जयस्तंभ चौकात राणे यांचा निषेध करण्यात आला. कोंबडीचोर असे लिहिलेल्या व राणे यांच्या फोटोला शिवसैनिकांनी चपला मारल्या. त्यानंतर पोस्टर रस्त्यावर ठेवून पायाखाली तुडविण्यात आले. तत्पूर्वी शहर पोलीस ठाण्यात राणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन दिले. नारायण राणेंचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा घ्या. मंत्रिमंडळातून त्यांना बडतर्फ करा, अशी मागणी पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.