मुकूल वासनिकांचा जिल्हा दौरा रद्द!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा मुकूल वासनिक उद्या, २१ जूनला बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र प्रकृती अस्वास्थतेच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. अंतर्गत गटबाजी आणि बुलडाण्याच्या माजी आमदाराच्या बंडामुळे जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा मुकूल वासनिक उद्या २१ जूनला बुलडाणा जिल्ह्यात येणार होते. मात्र हा दौरा रद्द …
Jun 20, 2021, 11:08 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा मुकूल वासनिक उद्या, २१ जूनला बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र प्रकृती अस्वास्थतेच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
अंतर्गत गटबाजी आणि बुलडाण्याच्या माजी आमदाराच्या बंडामुळे जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा मुकूल वासनिक उद्या २१ जूनला बुलडाणा जिल्ह्यात येणार होते. मात्र हा दौरा रद्द झाला आहे. जिल्ह्यात वासनिकविरोधी बंडाचा “श्रीगणेशा’ झाल्याने ते हे बंड कसे शमवतात, याकडे काँग्रेस जणांचे लक्ष लागले होते. मात्र बंड मोडीत काढण्याचे कामही काँग्रेस संस्कृतीनुसारच होत असल्याचे दिसून येत आहे. हा विषय थंड होईपर्यंत तरी आता जिल्हाध्यक्षही तेच राहतील, असे दिसून येते.