महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार जिल्ह्यात

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्याचे महसूल, ग्रामविकास, खार जमीन विकास विशेष सहाय्य व बंदरे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आज, १३ सप्टेंबरला सायंकाळी जिल्ह्यात दाखल झाले. उद्या, १४ सप्टेंबरला ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करतील. आज सायंकाळी चिखली शासकीय विश्राम गृहात त्यांचा मुक्काम आहे. मंत्री सत्तार यांचा दौरा..उद्या सकाळी १० वाजता चिखलीतीलच गांधीनगरकडे जातील. सकाळी १०.१० …
 
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार जिल्ह्यात

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्याचे महसूल, ग्रामविकास, खार जमीन विकास विशेष सहाय्य व बंदरे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आज, १३ सप्‍टेंबरला सायंकाळी जिल्ह्यात दाखल झाले. उद्या, १४ सप्टेंबरला ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्‍त भागाची पाहणी करतील. आज सायंकाळी चिखली शासकीय विश्राम गृहात त्‍यांचा मुक्काम आहे.

मंत्री सत्तार यांचा दौरा..
उद्या सकाळी १० वाजता चिखलीतीलच गांधीनगरकडे जातील. सकाळी १०.१० वाजता अभिजित राजपूत यांच्‍या निवासस्थानी भेट व राखीव, सकाळी १०.२० वाजता चिखली बाजार समिती सभापती नंदकिशोर त्र्यंबक सवडतकर यांच्या निवासस्थानी भेट, सकाळी १०.३० वाजता माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या निवासस्थानी भेट, सायंकाळी १०.४० वाजता सवणा (ता. चिखली) येथील चंदन शेष क्रीडा व व्यायाम मंडळ येथे वृक्षारोपण, ई पीक पाहणी, सकाळी ११.३० वाजता सागवण, कोलवड ता. बुलडाणा येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, दुपारी १२.१० वाजता पाडळी (ता. बुलडाणा) येथील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी, दुपारी १२.५० वाजता रोहिणखेड (ता. मोताळा) येथील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी, दुपारी १.२० वाजता वडगाव खंडोपंत (ता. मोताळा) येथील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी, दुपारी १.५० वाजता अंत्री, बोराखेडी (ता. मोताळा) येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, दुपारी २.२० वाजता शिवशंकरनगर, बुलडाणा येथे विशेष कार्य अधिकारी सुनील शेळके यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव, दुपारी २.४० वाजता महसूल व जिल्हा परिषद विभागांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीस उपस्थिती, दुपारी ४ वाजता साईनगर बुलडाणा येथे स्वीय सहायक विवेक मोगल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट व राखीव, दुपारी ४.२० वाजता शिवशंकरनगर बुलडाणा येथे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या निवासस्थानी भेट व राखीव, सोयीनुसार बुलडाणा येथून सिल्लोडकडे प्रयाण करतील.