मतदारांच्या दोन्ही हातांना बोटे नसल्यास शाई लावायची कुठे?…तर ही आहे तरतूद!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोणत्याही निवडणुकीसाठी होणार्या मतदानात उमेदवाराने पुन्हा मतदान करू नये यासाठी त्याच्या हाताच्या बोटाला विशिष्ट शाईने खुण करण्याचे प्रावधान आहे. मात्र दुर्दैवाने मतदाराच्या दोन्ही हातांना बोटेच नसतील तर काय..? सर्वच निवडणुकांची जय्यत व तपशीलवार पूर्वतयारी करणार्या निवडणूक आयोगाने यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. जिल्ह्यातील 500 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी हेच …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोणत्याही निवडणुकीसाठी होणार्‍या मतदानात उमेदवाराने पुन्हा मतदान करू नये यासाठी त्याच्या हाताच्या बोटाला विशिष्ट शाईने खुण करण्याचे प्रावधान आहे. मात्र दुर्दैवाने मतदाराच्या दोन्ही हातांना बोटेच नसतील तर काय..?

सर्वच निवडणुकांची जय्यत व तपशीलवार पूर्वतयारी करणार्‍या निवडणूक आयोगाने यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. जिल्ह्यातील 500 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी हेच निर्देश व कार्यप्रणाली राहणार आहे. जिल्ह्यातील 500 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 15 जानेवारीला होणार्‍या मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतदाराने पुन्हा मतदान करू नये यासाठी प्रत्येक निवडणुकीत ही विशिष्ट प्रकारची शाई लावण्यात येते. सर्वसाधारणपणे डाव्या हाताच्या तर्जनीस शाई लावण्यात येते. (मात्र अपरिहार्य स्थितीत यात बदल शक्य असतो) नियम 23 च्या पोट कलम 1 नुसार मतदाराने तर्जनी दाखविण्यास नकार दिला किंवा शाईची खुण करण्यास नकार दिला अथवा अगोदरच असलेली खुण नाहीशी करण्यासाठी काही कृती केल्यास त्याला मतदान करण्याची परवानगी नाकारण्यात येते. दुसरीकडे शाई लावण्यासाठी सर्वच संभाव्य शक्यतांचा आयोगाने विचार केला आहे. यासाठी विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. डाव्या हातास तर्जनी नसल्यास अन्य कोणत्याही बोटास शाई लावावी, डाव्या हातास कोणतेच बोट नसेल तर उजव्या हाताच्या तर्जनीस व तर्जनी नसल्यास अन्य कोणत्याही बोटास शाई लावावी. आता मतदाराच्या दोन्ही हातांना बोटे नसल्यास त्याच्या कोणत्याही हाताच्या भागाच्या टोकास शाई लावण्यात यावी असे निर्देश आहेत.