बुलडाणा तालुक्यातील 51 सरपंचांचा 3 टप्प्यांत फैसला, वाचा तुमच्या गावचे सरपंच किती तारखेला निवडले जाणार…
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील 51 सरपंचांचा फैसला 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान 3 टप्प्यांत होणार आहे. आज 2, फेब्रुवारीला संध्याकाळी हा मुहूर्त जाहीर झाल्याने अगोदरच वेगात असलेले राजकारण आता शिगेला पोहोचले आहे. तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकांची जय्यत तयारी करण्यात येत आहे. लवकरच सभेचे अध्यासी अधिकारी नेमण्यात …
Feb 2, 2021, 20:26 IST
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील 51 सरपंचांचा फैसला 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान 3 टप्प्यांत होणार आहे. आज 2, फेब्रुवारीला संध्याकाळी हा मुहूर्त जाहीर झाल्याने अगोदरच वेगात असलेले राजकारण आता शिगेला पोहोचले आहे. तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकांची जय्यत तयारी करण्यात येत आहे. लवकरच सभेचे अध्यासी अधिकारी नेमण्यात येणार आहेत.
- 9 फेब्रुवारीला दहिद खुर्द व बुद्रुक, देऊळघाट, सोयगाव, डोंगर खंडाळा, मासरूळ, मातला, नांद्रा कोळी, रुईखेड टेकाळे, साखळी बुद्रुक, शिरपूर, बिरसिंगपूर, कोलवड, सागवान व तांदुळवाडी येथील सरपंच निवडणूक होणार आहे.
- 10 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर अजीसपूर, भडगाव, देवपूर, गुम्मी, चांडोळ, जांब, हातोडी बुद्रुक, म्हसला बुद्रुक, पाडळी, पळसखेड भट व नागो, पांगरी, रायपूर, सातगाव म्हसला येथील कारभारी निवडले जातील.
- 11 फेब्रुवारीला डोमरुळ, तराडखेड, वरुड, अंभोडा, भादोला, धाड, धामणगाव, जामठी, जनुना, सावळी, कुलमखेड, दुधा, मालवंडी, मालविहिर, मढ, केसापूर, बोरखेड, सिंदखेड येथील निवडणुका पार पडतील.