बुलडाणा ः 14 सरपंचांची निवड; देऊळघाटचे पद रिक्त! उपसरपंचपदी 15 जणांची वर्णी; 15 गावांत विजयाचा जल्लोष
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींची पहिली विशेष सभा आज, 9 फेब्रुवारीला पार पडली. देऊळघाट वगळता 14 सरपंचांची तर 15 उपसरपंचांची यावेळी निवड करण्यात आली.
तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी यासाठी सभा घेण्यात आल्या. यावेळी नियुक्त अध्यासी अधिकार्यांनी सभा पार पडल्यावर नवनिर्वाचित सरपंच व उप सरपंचांची घोषणा केली. देऊळघाट सरपंचपद अनुसूचित जाती महिलेसाठी होते. मात्र या प्रवर्गाच्या सदस्या नसल्याने हे पद रिक्त राहिले. उपसरपंचपदी आरिफ खान हबीब खान यांची वर्णी लागली. उर्वरित ठिकाणचे निकाल असे ः दहिद बुद्रुक सरपंच अर्जुन दांडगे, उपसरपंच कविता देवकर, दहिद खुर्द सरपंच तेजराव शेळके, उपसरपंच संदीप पैठणे, सोयगाव सरपंच सरला मानटे, उपसरपंच वैशाली पिंपळे, डोंगरखंडाळा सरपंच बबन गाडगे, उपसरपंच श्याम सावळे, मासरूळ सरपंच शकुंतला महाले, उपसरपंच रुख्मिना काटोले, मातला सरपंच गजानन वतपाव, उपसरपंच आशा बर्डे, नांद्रा कोळी सरपंच आशा काळवाघे, उपसरपंच मनोज जाधव, रुईखेड टेकाळे सरपंच जयश्री टेकाळे, उपसरपंच सविता गायके, साखळी बुद्रुक सरपंच सुनीता भगत, उपसरपंच गजानन लवंगे, शिरपूर सरपंच दुर्गा शेळके, उपसरपंच मीना पवार, कोलवड सरपंच मीरा पवार, उपसरपंच अशोक पाटील, सागवान आरती सुहास वानेरे, उपसरपंच देवानंद दांडगे, तांदुळवाडी सरपंच अनिता रिंढे, उपसरपंच अलका खरे, बिरसिंगपूर सरपंच वैशाली शिंदे, उपसरपंच राजू फकिरबा मुळे.