पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपची जिल्ह्यात निदर्शने; तृणमूल काँग्रेसचा केला निषेध

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत व त्यानंतर सत्ताधारी पक्षतर्फे झालेल्या हिंसाचारात भाजपा कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आले. तसेच भाजपा कार्यालयावर हल्ले करण्यात आले, याचा आज, 5 मे रोजी भाजपतर्फे जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध करण्यात येऊन निदर्शने करण्यात आली.बुलडाणा, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद, चिखली आदी विविध ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये भाजपचे …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत व त्यानंतर सत्ताधारी पक्षतर्फे झालेल्या हिंसाचारात भाजपा कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आले. तसेच भाजपा कार्यालयावर हल्ले करण्यात आले, याचा आज, 5 मे रोजी भाजपतर्फे जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध करण्यात येऊन निदर्शने करण्यात आली.
बुलडाणा, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद, चिखली आदी विविध ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले, बुलडाणा येथे जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांना निवेदन देण्यात आले. या हिंसाचाराच्या घटना लोकशाही व संसदीय प्रणालीची हत्या असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.