नांदुरा : 3 गावांत प्रवर्गाचा सदस्यच नसल्याने पदे रिक्त; अन्य 15 गावांचे वाचा हे आहेत सरपंच, उपसरपंच

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील 15 गावांचे आज, 10 फेब्रुवारीला सरपंच, उपसरपंच निवडण्यात आले.एकूण 48 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला होऊन निकाल 18 जानेवारीला लागला होता. काल 15 ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच निवडल्यानंतर आज आणखी 15 गावांची सरपंच व उपसरपंच निवडणूक प्रक्रिया तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी राहुल तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.हे …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील 15 गावांचे आज, 10 फेब्रुवारीला सरपंच, उपसरपंच निवडण्यात आले.
एकूण 48 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला होऊन निकाल 18 जानेवारीला लागला होता. काल 15 ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच निवडल्यानंतर आज आणखी 15 गावांची सरपंच व उपसरपंच निवडणूक प्रक्रिया तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी राहुल तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
हे आहेत सरपंच, उपसरपंच…

  • जवळा बाजार ः सरपंच पद रिक्त, उपसरपंच सौ. नंदाताई मुरलीधर शिगोटे (अविरोध)
  • मेंढळी ः सरपंच केसरबाई एकनाथ शेंडकाळे, उपसरपंच सौ. उज्ज्वला उत्तम नरवाडे (अविरोध)
  • बेलुरा ः सरपंच विनायक नत्थु इंगळे, उपसरपंच मेहंगे सीमा विनोद (अविरोध)
  • वसाळी ः सरपंच सौ. वनिता बळीराम गिर्‍हे, उपसरपंच खा नसिमाबी करीम (अविरोध)
  • खळदगाव ः सरपंच प्रविण महादेव मानकर, उपसरपंच सौ. सुनीता दिनकर मानकर (अविरोध)
  • माळेगाव गोंड ः सरपंच पद रिक्त, उपसरपंच दत्तात्रय गजानन गोंड (अविरोध)
  • पिंपळखुटा खुर्द ः सरपंच योगेश कडू पाटील, उपसरपंच सौ. आशा अशोक सोनोने (अविरोध)
  • शेंबा खुर्द ः सरपंच सौ वंदना पुरुषोत्तम ढोण, उपसरपंच दीपक देविदास दाभाडे (अविरोध)
  • शेंबा बुद्रूक ः सरपंच नंदकिशोर गजानन खोदले, उपसरपंच जगन्नाथ सदाशिव भोपळे (अविरोध)
  • डिघी ः सरपंच सौ. लता विठ्ठल लांडे, उपसरपंच सौ. सविता राजेंद्र सुरडकर (अविरोध)
  • टाकरखेड ः सरपंच सौ. विद्या पुंडलिक वराडे, उपसरपंच जयप्रकाशसिंह विजय सिंह जाधव (अविरोध)
  • भुईशेंगा ः सरपंच सौ. पंचशीला दिनेश वाकोडे, उपसरपंच सौ. ज्योती मनोहर काटे (अविरोध)
  • महाळुंगी ः सरपंच सौ. अल्काबाई अरुण डिवरे, उपसरपंच सौ. हरिश्‍चंद्र लेनाजी वानखडे (अविरोध)
  • अमलपूर ः सरपंच पद रिक्त, उपसरपंच कृष्णकांत रामभाऊ सुशिर (अविरोध)
  • विटाळी सरपंच गजानन रुपचंद क्षीरसागर, उपसरपंच रिता आनंद बोडवडे (निवडून)
    भुईशेंगा येथील सरपंच व उपसरपंच पदाची निवड ईश्‍वर चिठ्ठीने झाली.
    जवळा बाजार, अमलपूर, माळेगाव गोंड येथे सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला असून तेथे अनुसूचित जमाती महिला उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले नसल्याने दोन्ही पदे रिक्तराहिली, असे नायब तहसीलदार संजय मार्कड, आर. आर. बोदडे यांनी बुलडाणा लाईव्हला सांगितले.