घोंगडी बैठकांतून “राष्ट्रवादी’चा सामान्यांशी संवाद!; तालुकाध्यक्ष डी. एस. लहाने यांचा पुढाकार

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विचार गावागावातील सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संपूर्ण तालुक्यात घोंगडी बैठकीचे आयोजन केल्याची माहिती तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य डी. एस. लहाने यांनी दिली.दुधा (ता. बुलडाणा) येथील घोंगडी बैठकीत काल, १५ जुलैला ते बोलत होते. दुधा येथून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विचार गावागावातील सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संपूर्ण तालुक्‍यात घोंगडी बैठकीचे आयोजन केल्याची माहिती तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य डी. एस. लहाने यांनी दिली.
दुधा (ता. बुलडाणा) येथील घोंगडी बैठकीत काल, १५ जुलैला ते बोलत होते. दुधा येथून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तथा कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज दांडगे यांनी पक्षवाढीबद्दल विचार मांडले. महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनुजाताई सावळे, विधानसभा उपाध्यक्ष राजेश गवई यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. यावेळी गणेश कोरके, श्रीराम सुसर, गौरव देशमुख, विशाल फदाट यांची प्रमुख उपस्‍थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन विशाल सोनुने यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. गणेश कड यांनी केले.

अभियानाचा उद्देश…
घोंगडी बैठकी घेण्याचा उद्देश सांगताना श्री. लहाने यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले, की पक्षाने शेतकरी, शेतमजूर, महिलांसाठी केलेली कामे, युवकांसाठीचे धोरण, आपत्ती व्‍यवस्‍थापनात घेतलेली भूमिका, कोरोना काळात डॉक्‍टर्स, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, गोरगरीब जनता, फ्रंटलाइन वर्कर्स यांच्‍यासाठी केलेली कामे, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे कोरोना काळातील योगदान सामान्यांपर्यंत या बैठकांच्‍या माध्यमातून पोहोचवले जात आहे.