खामगाव- जालना रेल्वेमार्गाचे कामास गती द्या; आमदार सौ. श्वेताताई महाले यांची रेल्वे मंत्री दानवे यांच्याकडे मागणी
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ब्रिटिश काळापासून रखडलेल्या खामगाव- जालना रेल्वेमार्गाचे काम सुरू करण्यासाठी राज्य शासन व रेल्वे मार्गास गती देण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. यासंदर्भात काल, ८ सप्टेंबरला आमदार सौ. महाले पाटील यांनी मंत्री दानवे यांची नरिमन पाइंट येथील महारेल या मुंबई येथील कार्यालयात …
Sep 9, 2021, 21:58 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ब्रिटिश काळापासून रखडलेल्या खामगाव- जालना रेल्वेमार्गाचे काम सुरू करण्यासाठी राज्य शासन व रेल्वे मार्गास गती देण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. यासंदर्भात काल, ८ सप्टेंबरला आमदार सौ. महाले पाटील यांनी मंत्री दानवे यांची नरिमन पाइंट येथील महारेल या मुंबई येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली.
असाही योगायोग…
आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील खामगाव- जालना रेल्वे मार्गाचे निवेदन देण्यासाठी “महारेल’च्या कार्यालयात गेल्या असता दानवे पाटील हे राज्यातील नवीन रेल्वेमार्गा संदर्भात उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेणार होते. त्याच विषयाचे निवेदन घेऊन आ. महाले या गेल्याने दानवे यांनी त्यांना त्या मिटिंगमध्येच बसण्यास सांगितले.