कोरमअभावी बारगळली धाड सरपंचपदाची निवड! आता उद्या निवडणूक; “बुलडाणा लाइव्ह’चे वृत्त तंतोतंत खरे!!, सावित्री बोर्डे यांची निवड निश्चित?

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील धाडच्या सरपंचपदाची आज, 27 सप्टेंबरला होणारी निवडणूक कोरम अभावी बारगळली! आता हीच निवडणूक उद्या, 28 सप्टेंबरला पार पडणार आहे. मात्र स्टेची अडचण नसली तर उद्या सावित्री बोर्डे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. यासंदर्भात बुलडाणा लाईव्हचे 26 सप्टेंबर रोजीचे वृत्त आणि व्यक्त केलेले …
 
कोरमअभावी बारगळली धाड सरपंचपदाची निवड! आता उद्या निवडणूक; “बुलडाणा लाइव्ह’चे वृत्त तंतोतंत खरे!!, सावित्री बोर्डे यांची निवड निश्चित?

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील धाडच्‍या सरपंचपदाची आज, 27 सप्‍टेंबरला होणारी निवडणूक कोरम अभावी बारगळली! आता हीच निवडणूक उद्या, 28 सप्‍टेंबरला पार पडणार आहे. मात्र स्टेची अडचण नसली तर उद्या सावित्री बोर्डे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.

यासंदर्भात बुलडाणा लाईव्हचे 26 सप्टेंबर रोजीचे वृत्त आणि व्यक्त केलेले भाकीत तंतोतंत अचूक ठरले. आज, 27 सप्टेंबर रोजी दुपारी होणाऱ्या निवडणुकीवर स्टे आणण्याचे काँग्रेस गटाचे प्रयत्न होते. ते नाहीच झाले तर कोरमचा तांत्रिक पर्याय वापरण्याचा पर्याय होता. त्यामुळे आणखी एक दिवसांचा अवधी मिळावा हा त्यामागील हेतू होता. अखेर त्यांना दुसरा पर्याय वापरणे भाग पडले! आज सरपंच पदासाठी सावित्री सत्यवान बोर्डे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला.

अध्यासी अधिकारी जी. टी. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम पंचायत भवनात सुरू झालेल्या सभेला रिजवान सौदागर गटाचे 9 सदस्य गैरहजर राहिले. नियमानुसार सभेला 9 सदस्य हजर असणे आवश्यक होते. यामुळे आजची सभा बारळगल्याने राष्ट्रवादी गटासह बोर्डे समर्थकांची निराशा झाली. मात्र ही रद्द झालेली सभा लगेच दुसऱ्या दिवशीच घ्यावी लागते अन्‌ मग त्याला कोरमचे बंधन नसते, असे प्रावधान आहे. त्यामुळे उद्या दुपारी 2 वाजता सभा लावण्यात आली आहे. स्टे नाही मिळाला तर उद्या फार तर 3 वाजता सावित्री बोर्डे यांच्या विजयाचा गुलाल धाडच्या आकाशी उधळताना दिसणार हाय…