उद्या जिल्हाभर भाजपचे चक्का जाम आंदोलन, काँग्रेसही करणार निषेध

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून, उद्या, २६ जूनला जिल्हाभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांतील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. हा सर्व ओबीसी बांधवांचा विश्वासघात महाराष्ट्रातील आघाडी सरकारने केला आहे. ओबीसी बांधवांना राज्य सरकारने न्याय मिळवून द्यावा, यासाठी जिल्हाभर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून, उद्या, २६ जूनला जिल्हाभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे स्‍थानिक स्वराज्‍य संस्‍थांतील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. हा सर्व ओबीसी बांधवांचा विश्वासघात महाराष्ट्रातील आघाडी सरकारने केला आहे. ओबीसी बांधवांना राज्‍य सरकारने न्याय मिळवून द्यावा, यासाठी जिल्हाभर चक्‍काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांनी दिली. जिल्ह्यातील प्रत्येक मंडळ, तालुका आणि शहराच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यात हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचेही ते म्हणाले.

या आंदोलनांवर राहणार विशेष लक्ष
जिल्ह्यात भाजपचे तीन लढवय्ये आमदार असल्याने तीन मतदारसंघांत उद्याचे चक्काजाम आंदोलन चांगलेच पेटण्याची शक्यता आहे. चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांचा लढवय्या स्वभाव बघता चिखलीच्या खामगाव चौकात होणाऱ्या चक्का जाम आंदोलनावर पोलीस प्रशासनाची करडी नजर असेल. घाटाखाली जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर आणि आमदार संजय कुटे यांच्या नेतृत्वात होणारे आंदोलनही लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

काँग्रेस करणार निषेध आंदोलन
ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्‍य सरकारमुळेच रद्द झाल्‍याचा भाजपचा आरोप असला तरी, काँग्रेसने मात्र याचे खापर मोदी सरकारवर फोडले आहे. मोदी सरकारचा निषेध उद्या, २६ जूनला प्रत्‍येक तालुका, शहर शाखेतर्फे केला जाणार आहे. तसे आवाहन जिल्हा सरचिटणीस सतीश मेहेंद्रे यांनी केले आहे.