उंद्री नव्‍हे उदयनगर म्‍हणा!; लवकरच नामकरण होण्याचा मार्ग मोकळा!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उंद्री हे नाव शिवी दिल्यासारखे असल्याने चिखली तालुक्यातील उंद्री या गावाचे नाव उदयनगर असे करावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून उंद्रीचे ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी त्या महिला व बाल कल्याण सभापती असतानाच याबाबत शासनाकडे मागणी केली होती. परंतु लालफितशाहीत अडकलेल्या फाईलला आमदार सौ. महाले …
 
उंद्री नव्‍हे उदयनगर म्‍हणा!; लवकरच नामकरण होण्याचा मार्ग मोकळा!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उंद्री हे नाव शिवी दिल्यासारखे असल्याने चिखली तालुक्यातील उंद्री या गावाचे नाव उदयनगर असे करावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून उंद्रीचे ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी त्या महिला व बाल कल्याण सभापती असतानाच याबाबत शासनाकडे मागणी केली होती. परंतु लालफितशाहीत अडकलेल्या फाईलला आमदार सौ. महाले पाटील यांच्‍या प्रयत्‍नांमुळे दिशा मिळाली असून, या प्रकरणाची नव्याने त्रुटींची पूर्तता करून सादर केल्याने उंद्रीचे उदयनगर असे नामकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला अाहे. काही दिवसांतच चिखली तालुक्यात उदयनगरचा उदय होण्याची आशा वाढली आहे.

2018 पासून रेंगाळत पडलेल्या उंद्रीच्या नामकरण फाईलला सुद्धा खऱ्या अर्थाने उंद्रीच लागली होती. उंद्री लागणे किंवा उंद्री या शब्दातून उपरोधिक किंवा शिवी दिल्याचा भास होत असल्यानेच उंद्री या गावचे नाव बदलून उदयनगर करावे, असे प्रयत्‍न आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी सुरू केले होते. उंद्री (ता. चिखली जि. बुलडाणा) या गावाचे उदयनगर असे नामांतर करण्याबाबतची मागणी त्‍यांनी २ मार्च २०१७ रोजी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाव्दारे केली होती. मागणीनुसार ग्रामपंचायतीने ग्रामसभा व ठराव घेतला होता. शासन दरबारी तसा प्रस्‍ताव सादर करण्यात आला. मात्र केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वातील सूचनांप्रमाणे प्रस्ताव नसल्याने तो मंजूर होऊ शकला नाही. त्यामुळे आमदार सौ. महाले पाटील यांनी याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.

त्यांच्या पाठपुराव्यामुळे २१ जुलै २०२१ रोजी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव यांच्याकडून विभागीय आयुक्त अमरावती यांना सुधारित व निकषानुसार प्रस्ताव सादर करण्याचे पत्र देण्यात आले होते. त्या पत्रानुसार सुधारित, परिपूर्ण व आवश्यक त्या शिफारशीसह २६ ऑगस्‍ट २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला. शासनाकडे प्रस्ताव सादर झाल्यानंतर उर्वरित महसुली सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर उंद्री या गावचे नामकरण उदयनगर होणार आहे.