आमदार श्वेताताई महाले यांचा सवाल ः दोनच दिवसांच्या अधिवेशनात समस्या कशा सुटतील?

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यात आघाडी सरकार सत्तारूढ झाल्यापासून झालेली सर्वच अधिवेशने नावापुरतीच झाली असून, अजूनपर्यंत कोणतेही लोक कल्याणकारी निर्णय या सरकारला घेता आलेले नाही. एवढेच नव्हे तर या आघाडी सरकारची उत्तरे देण्याची सुद्धा तयारी नसल्यानेच आतापर्यंत कोणतेही अधिवेशन पूर्ण काळ चालले नाही. आता ५ जुलैपासून सुरू होणारे अधिवेशनसुद्धा केवळ दोनच दिवस घेण्याचे ठरवले …
 
आमदार श्वेताताई महाले यांचा सवाल ः दोनच दिवसांच्या अधिवेशनात समस्या कशा सुटतील?

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राज्यात आघाडी सरकार सत्तारूढ झाल्यापासून झालेली सर्वच अधिवेशने नावापुरतीच झाली असून, अजूनपर्यंत कोणतेही लोक कल्याणकारी निर्णय या सरकारला घेता आलेले नाही. एवढेच नव्हे तर या आघाडी सरकारची उत्तरे देण्याची सुद्धा तयारी नसल्यानेच आतापर्यंत कोणतेही अधिवेशन पूर्ण काळ चालले नाही. आता ५ जुलैपासून सुरू होणारे अधिवेशनसुद्धा केवळ दोनच दिवस घेण्याचे ठरवले आहे. दोन दिवसांत राज्यातील जनतेच्या समस्या कशा सुटतील, असा सवाल आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केला आहे.

राज्य सरकारने पावसाळी अधिवेशन दोनच दिवस घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍यावर आमदार सौ. महाले पाटील यांनी टीका केली आहे. त्‍या म्‍हणाल्या, की यावर्षी पावसाळी अधिवेशनाचा नियोजित कालावधी पंधरा दिवसांचा असताना आणि कोरोनाचा प्रादुर्भाव बराच कमी झाल्याने यावेळेस पूर्ण वेळ अधिवेशन होऊन गत्‌ दोन वर्षांपासून जनतेच्या प्रलंबित समस्यांवर उपाययोजना होईल ही अपेक्षा होती. कोरोना हे संकट आहे जगासाठी पण आघाडी सरकार त्याचा कवच म्हणून वापर करत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व कार्यालयीन प्रक्रिया ठप्प होती. राज्यातील कोट्यवधी नागरिकांचे शासकीय प्रश्न प्रलंबित आहेत. त्रस्त झालेले नागरिकांना अधिवेशनात न्याय मिळण्याची आशा होती. पण आता ती आशा सुद्धा मावळल्याने या सरकारच्या काळात जनतेला न्याय मिळेल की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, रखडलेली भरती प्रक्रिया, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक कर्जाचा विषय, पीकविमा, पेरणी सुरू झालेली असताना शेतकऱ्यांचे अडविलेले शेत रस्ते मोकळे करणे, गडप झालेला पाऊस, बियाण्याची टंचाई, वाढीव वीजबिलाची मोगलाई पद्धतीने सुरू असलेली वसुली, आशा कार्यकर्त्यांच्या वेतनवाढीची मागणी अशा अनेक विषयांना, शासकीय कार्यालयातील रिक्त पदे, कोरोना काळात निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडायची आहे पण या सरकारला जनतेच्या प्रश्नच सोडविता येत नसल्यानेच पंधरा दिवसांचे अधिवेशन दोनच दिवसांत गुंडाळत असल्याचे आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी म्‍हटले आहे.