आमदार असावा अस्सा… कोरोनामुळे छत्र हरवलेल्या अनाथांचे बनणार ‘नाथ’!

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाने अनेकांचे प्राण हिरावले. त्यांची लेकरं अनाथ झालीत. त्यांना जगण्याचे बळ देऊन शिक्षण व निवासाची व्यवस्था करण्याचा निर्णय जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांनी घेतला आहे. 18 वर्षांखालील मुलांना आर्थिक आधार देणार असल्याचे त्यांनी काल, 18 मे रोजी बुलडाण्यात सांगितले. भाजपातर्फे बुलडाणा येथे स्व. अटलजी …
 

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाने अनेकांचे प्राण हिरावले. त्‍यांची लेकरं अनाथ झालीत. त्‍यांना जगण्याचे बळ देऊन शिक्षण व निवासाची व्‍यवस्‍था करण्याचा निर्णय जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांनी घेतला आहे. 18 वर्षांखालील मुलांना आर्थिक आधार देणार असल्याचे त्‍यांनी काल, 18 मे रोजी बुलडाण्यात सांगितले.

भाजपातर्फे बुलडाणा येथे स्व. अटलजी कोविड आरोग्‍य सुविधा केंद्र व मोताळा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय कोविड आरोग्‍य सुविधा केंद्र निःशुल्क सुरू करण्यात आले असून, त्‍यांच्‍या उद्‌घाटन प्रसंगी डॉ. कुटे बोलत होते. भाजपातर्फे ठिकठिकाणी कोविड केंद्र सुरू करण्यात येत असून, कोरोनाग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. आता ऑक्सिजन निर्मिती यंत्र प्रत्‍येक तालुक्‍यात व गावातील आरोग्‍य केंद्रात बसविण्यासाठी पुढाकार घेत असून, येत्‍या 8 दिवसांत 40 यंत्र मिळणार आहेत. शासनावर विसंबून न राहता समाजातील दानशूर व सामाजिक संस्‍था, संघटनांच्‍या कार्यकर्त्यांनी कोरोना काळात जी काही मदत करता येईल ती रुग्‍णसेवा हीच ईश्वरसेवा मानून करावी. यासाठी आपण कोरोना काळात पितृ व मातृछत्र हरवलेल्या निराधार अनाथांना आर्थिक व शैक्षणिक मदत करणार असल्याचे श्री. कुटे म्‍हणाले.