…अन्‌ त्‍या गोवंशावर झाले अंत्‍यसंस्‍कार!; बुलडाणा लाइव्‍हचा पाठपुरावा!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गोवंश मरून पडल्यानंतर त्याची परवड होऊ नये यासाठी बुलडाणा लाइव्हने पाठपुरावा करत अखेर नगरपालिकेला तो मृतदेह उचलून नेण्यास भाग पाडले. बुलडाणा- चिखली रस्त्यावर पोलीस स्टेशनच्या बाजूला काल, 3 मार्चच्या सायंकाळी 6 पासून एक गोवंश (मोठा गोऱ्हा) मृत्यूमुखी होऊन पडला होता. ही बाब वृत्तसंकलनासाठी गेलेल्या बुलडाणा लाइव्हचे जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गोवंश मरून पडल्‍यानंतर त्‍याची परवड होऊ नये यासाठी बुलडाणा लाइव्‍हने पाठपुरावा करत अखेर नगरपालिकेला तो मृतदेह उचलून नेण्यास भाग पाडले.

बुलडाणा- चिखली रस्त्यावर पोलीस स्टेशनच्या बाजूला काल, 3 मार्चच्‍या सायंकाळी 6 पासून एक गोवंश (मोठा गोऱ्हा) मृत्‍यूमुखी होऊन पडला होता. ही बाब वृत्तसंकलनासाठी गेलेल्या बुलडाणा लाइव्हचे जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ यांच्‍या नजरेस पडली. त्‍यांनी तातडीने ही बाब नगरपरिषदेला कळवली. मात्र “आता सर्व कर्मचारी घरी गेले आहेत. रात्र झाली आहे. त्याला उचलायला जेसीबी लागेल. हे आता शक्य होणार नाही. सकाळी दिवस उजाडण्यापूर्वी आम्ही त्याला घेऊन जाऊ”, असे नगर परिषदेकडून सांगण्यात आले. मात्र सकाळपर्यंत कुत्रे लचके तोडतील अशी भीती असल्‍याने बुलडाण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या काही युवकांनी रात्रभर त्या गोवंशाचे रक्षण केले. यात सचिन देशमुख, सागर राजपूत (खामगाव), समीर देशमुख, शंकर टेरे यांचा समावेश होता. दुपारपर्यंतही गोवंश तिथेच पडून असल्याचे युवकांनी कळवल्‍यानंतर बुलडाणा लाइव्‍हने तातडीने पुन्‍हा नगरपरिषदेला कळवले. त्‍यावर लगेचच दुपारी हा गोवंश नेण्यात आला.