‘या’ अभिनेत्रीच्या खटल्यातून न्यायमूर्ती बाहेर

नवीदिल्ली ः ‘फाईव्ह जी’ नेटवर्क’ला विरोध करीत, त्याविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या अभिनेत्री जुही चावला हिच्या खटल्यातून न्यायमूर्ती संजीव नरूला बाहेर पडले. यापूर्वी जुहीची याचिका फेटाळून तिला वीस लाख रुपयांचा दंड करण्यात आला होता.जुही चावला हिने दाखल केलेली याचिका मुख्य न्यायाधीशांच्या आदेशानुसार अन्य खंडपीठापुढे जाणार आहे. २९ तारखेपर्यंत या याचिकेची सुनावणी स्थगित करताना न्या. नरूला यांनी …
 

नवीदिल्ली ः ‘फाईव्ह जी’ नेटवर्क’ला विरोध करीत, त्याविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या अभिनेत्री जुही चावला हिच्या खटल्यातून न्यायमूर्ती संजीव नरूला बाहेर पडले. यापूर्वी जुहीची याचिका फेटाळून तिला वीस लाख रुपयांचा दंड करण्यात आला होता.
जुही चावला हिने दाखल केलेली याचिका मुख्य न्यायाधीशांच्या आदेशानुसार अन्य खंडपीठापुढे जाणार आहे. २९ तारखेपर्यंत या याचिकेची सुनावणी स्थगित करताना न्या. नरूला यांनी त्यातून बाहेर पडण्याचे जाहीर केलेl; परंतु त्याचे कारण दिले नाही. फाईव्ह जी संदेश लहरीमुळे आरोग्याला आणि पर्यावरणाला धोका होतो, असा मुद्दा उपस्थित करीत जुही चावला हिने याचिका दाखल केली होती. न्या. जे. आर. मिढा यांनी ही याचिका फेटाळण्यात आल्याचे जाहीर केले होते. तसेच तिला वीस लाख रुपये जमा करण्याचा आदेश दिला होता. त्यावर पर्यावरणप्रेमींनी टीका केली होती.
चावला हिच्या वकिलांनी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले. “सुनावणीच्या टप्प्यापर्यंत अजून न पोचलेली याचिका कायद्यानुसार फेटाळली जाऊ कशी शकते, असा सवाल करून ती रद्द होऊ शकते,’ असे त्यांनी म्हटले होते. चावला यांनी वीस लाख रुपयांच्या दंडमाफीसाठी अर्ज केला नाही. ही रक्कम जमा करण्यासाठी तिला न्यायालयाने एक आठवड्याची मुदत दिली. न्यायालयीन फी परत करण्याचा अर्जही चावला यांनी मागे घेतला. या पार्श्वभूमीवर आता न्यायमूर्तींनीच अंग काढून घेतल्याने आता हे प्रकरण कुणापुढे चालणार, याची उत्सुकता आहे.