हैदराबादेत जन्मली माशाच्या आकाराची मुलगी

हैदराबाद : शारिरीक दुर्बलतेमुळे विचित्र आकाराचे बाळ जन्मल्याच्या घटना वैद्यकीय क्षेत्रात नव्या नाहीत. तेलंगणात माशाच्या आकारचे एक बाळ जन्मल्याची आश्चर्यकारक घटना हैदराबाद शहरात घडली आहे. हैदराबादेतील पेटलाबुराज मॅटरनिटी रुग्णालयात एका महिलेने नुकताच एका मुलीला जन्म दिला. पण ती अल्पजीवी ठरली. या मुलीचे कमरेखालील दोन्ही पाय जुळलेल्या स्थितीत होते. त्यामुळे ती माशाच्या आकाराची वाटत होती.वैद्यकीय तज्ज्ञांनी …
 

हैदराबाद : शारिरीक दुर्बलतेमुळे विचित्र आकाराचे बाळ जन्मल्याच्या घटना वैद्यकीय क्षेत्रात नव्या नाहीत. तेलंगणात माशाच्या आकारचे एक बाळ जन्मल्याची आश्चर्यकारक घटना हैदराबाद शहरात घडली आहे. हैदराबादेतील पेटलाबुराज मॅटरनिटी रुग्णालयात एका महिलेने नुकताच एका मुलीला जन्म दिला. पण ती अल्पजीवी ठरली. या मुलीचे कमरेखालील दोन्ही पाय जुळलेल्या स्थितीत होते. त्यामुळे ती माशाच्या आकाराची वाटत होती.वैद्यकीय तज्ज्ञांनी अशा आकाराच्या मुलीला मरमेड बेबी म्हटले जात असल्याचे सांगितले.या नवजात बाळाला सिरेनोमेलिया म्हणजे मरमेड सिंड्रोम नावाचा आजार होता. ज्यामुळे जन्मत: च अवघ्या दोन तासांत या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.या मुलीच्या आकाराचा आधी अंदाज आला नाही. त्यामुळे तिचा जन्म ही जटील समस्या बनली व तिला वाचवता आले नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.