हिरेन यांना घेऊन जाणारी तिसरी मर्सिडीज कुणाची?

मनसूख हिरेन प्रकरणाचा गुंता वाढलमुंबई : मनसूख हिरेन मृत्यूप्रकरण तसेच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या त्या स्फोटकांनी भरलेल्या कारप्रकरणाचे गूढ वरचेवर वाढत आहे. आंनबी यांच्या घराबाहेरील स्कॉर्पिओ, त्यापासून काही अंतरावर असलेली इनोव्हा या पाठोपाठ आता आणखी एका मर्सिडीज कारचा शोध एनआयएकडून घेतला जात आहे. तपास यंत्रणेच्या हाती त्यासंदर्भात काही सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. छत्रपती …
 

मनसूख हिरेन प्रकरणाचा गुंता वाढल
मुंबई :
मनसूख हिरेन मृत्यूप्रकरण तसेच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या त्या स्फोटकांनी भरलेल्या कारप्रकरणाचे गूढ वरचेवर वाढत आहे. आंनबी यांच्या घराबाहेरील स्कॉर्पिओ, त्यापासून काही अंतरावर असलेली इनोव्हा या पाठोपाठ आता आणखी एका मर्सिडीज कारचा शोध एनआयएकडून घेतला जात आहे. तपास यंत्रणेच्या हाती त्यासंदर्भात काही सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर एका मर्सिडीजमध्ये व्यापारी मनसुख हिरेन बसलेले आहेत. सीसीटीव्हीनुसार हिरन तेथे कोणाची तरी वाट पाहत होते. त्यानंतर ही मर्सिडीज कार तेथे आली त्यात बसून ते निघून गेले. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याचे म्हटले जात आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत कोण होते हेही त्या कारचा शोध लागल्यावरच कळू शकेल. या कारचा शोध लागल्यास मनसूख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणावर प्रकाश पडू शकेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.