हादरवून टाकणारी बातमी… तब्बल ७५ तरुणींशी लग्न, दरमहा ५५ मुलींना ओढायचा जाळ्यात अन्‌ २०० मुलींना ढकलले वेश्या व्यवसायात!

इंदौर : मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यांच्याशी लग्न करायचे आणि त्यांना भारतात आणून वेश्याव्यवसायात ढकलायचे, असा धंदा मांडणाऱ्या मुनिरला इंदौर पोलिसांनी सुरत येथून नुकतीच अटक केली. तो बांगलादेशी तरुण आहे. मुनीरच्या चौकशीतून समोर आलेल्या खुलाशामुळे पोलीसही चक्रावले आहेत. ११ महिन्यापूर्वी इंदोर पोलिसांनी शहरातील लासुडिया आणि विजयनगर भागात कारवाई करून ३१ बांगलादेशी मुलींची सुटका केली होती. …
 
हादरवून टाकणारी बातमी… तब्बल ७५ तरुणींशी लग्न, दरमहा ५५ मुलींना ओढायचा जाळ्यात अन्‌ २०० मुलींना ढकलले वेश्या व्यवसायात!

इंदौर : मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्‍यांच्याशी लग्न करायचे आणि त्यांना भारतात आणून वेश्याव्यवसायात ढकलायचे, असा धंदा मांडणाऱ्या मुनिरला इंदौर पोलिसांनी सुरत येथून नुकतीच अटक केली. तो बांगलादेशी तरुण आहे.

मुनीरच्या चौकशीतून समोर आलेल्या खुलाशामुळे पोलीसही चक्रावले आहेत. ११ महिन्यापूर्वी इंदोर पोलिसांनी शहरातील लासुडिया आणि विजयनगर भागात कारवाई करून ३१ बांगलादेशी मुलींची सुटका केली होती. याप्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली होती तर मुनिर फरार होता. तेव्हापासून पोलीस मुनिरच्या शोधात होते. मुनिरने पोलिसांना सांगितले, की बांगलादेशी मुली आणि महिला त्याचे लक्ष्य होत्या. ५ वर्षांपासून तो लैंगिक तस्करीच्या व्यवसायात होता. प्रत्येक महिन्याला ५५ तरुणींना तो जाळ्यात ओढत असे. काहींना प्रेम, लग्नाचे अमिष तर काहींना भरपूर पैसे मिळवून देण्याचे आश्वासन तो देत होता.

मुनिरने २०० बांगलादेशी तरुणींना भारतात आणून वेश्याव्यवसायात ढकलल्याचे त्याने सांगितले. त्यासाठी त्यांनी ७५ तरुणींशी लग्न केले. भारत- बांगलादेशच्या पोरस सीमेवरील नाल्यातून तो तरुणींना भारतात आणत होता. सीमेजवळील छोट्या गावातील एजंटच्या मदतीने तरुणींना मोठ्या शहरात आणले जात होते. तिथे देहबोली आणि राहणीमानाचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या शहरात देहविक्रीसाठी पाठविण्यात येत होते. सध्या मुनिर इंदौर पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याकडून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.