हा ‘रणनीतीकार’ काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

नवी दिल्ली : बिहारमधील संयुक्त जनता दलात मोठे पद भोगूनही नंतर ते सोडावे लागलेले राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर या चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांची प्रशांत किशोर यांनी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात …
 

नवी दिल्ली : बिहारमधील संयुक्त जनता दलात मोठे पद भोगूनही नंतर ते सोडावे लागलेले राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर या चर्चेला उधाण आले आहे.

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांची प्रशांत किशोर यांनी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात 2024 च्या निवडणुकीसाठी देशभरात विरोधी पक्षांची मोठी आघाडी उभी करण्याचा किशोर यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या दोन महिन्यांत अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. शरद पवार यांची तीनदा भेट घेतली. आता ते काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करीत आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशासह सहा राज्यांच्या विधानसभेच्या पुढच्या वर्षी निवडणुका आहेत. अशा पार्श्वभूमीवर रणनीतीक सल्ला देण्यासाठी ही भेट होती का, अशी चर्चा सुरू होती; परंतु राजकीय रणनीती करण्याच्या कामातून संन्यास घेण्याची घोषणा प्रशांत किशोर यांनी केली होती. त्यामुळे ते सक्रिय राजकारणात येण्याच्या चर्चेला अधिकच बळ मिळत आहे.