हनिमूनच्या रात्री पत्नीचे खरे रूप समजले.. हादरलेला पती पोहोचला थेट ठाण्यात
भोपाळ : सुखी संसाराची स्वप्ने रंगवत तरुण-तरुणी लग्न करतात. पण लग्न केल्याने खरेच त्यांना सर्व सुख मिळतेच असे नाही. असाच काहीसा फसवणुकीचा प्रकार मध्य प्रदेशातील तरुणाच्या वाट्याला आला आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री बेडरूममध्ये गेल्यावर पतीला समजले की, आपली पत्नी किन्नर असल्याचे धक्कादायक सत्य समजलेयामुळे मुळापासून हादरलेल्या तरुणाने आपली वैâफियत मांडण्यासाठी चक्क पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याआधी त्याने सासर्याला फोन लावून आपली फसवणूक केल्याबद्दल शिव्यांची लाखोली वाहिली.आता याप्रकरणात तो सासरा व पत्नीवर केस दाखल करून भरपाईची मागणी करण्याच्या विचारात आहे, असे समजते.
मध्य प्रदेशात शिवपुरी जिल्ह्यातील भावखेडी येथील एका तरुणाची लग्नाच्या नावाखाली विचित्र फसवणूक झाली. पंखी जाटवा,असे या तरुणाचे नाव आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री हा युवक जेव्हा पत्नीजवळ गेला. तेव्हा ती किन्नर असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने त्याचवेळी सासर्याला फोन लावून शिव्या घातल्या. फसवणूक केल्याचा आरोप केला. दुसर्या दिवशी पत्नीला दवाखान्यात येऊन स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तिची तपासणी करविली. त्यावेळी पत्नीमध्ये महिलेची लक्षणे, गुणसूत्रे कमी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या पंखी जाटव याने पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दिली आहे. त्यात लग्नाच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याची फिर्याद त्याने दिली आहे. आपली पत्नी किन्नर असून ती आता लग्न कायम ठेवण्यासाठी मला धमकावत आहे. लग्न मोडायचे असल्यास पोटगी दे म्हणून त्रास देत असल्याचे म्हटले आहे. त्याने त्याच्या पत्नीला माहेरी पाठवून दिले आहे. परंतु पत्नीला त्याने ठेवून घ्यावे यासाठी सासरची मंडळी दबाव आणत आहेत, असाही आरोप त्याने केला आहे.