सुनेशी अनैतिक संबंधात मुलाचा अडथळा; बापानं काढला काटा

पाटणा : मुलीसमान असलेल्या सुनेशी अनैतिक संबंधात मुलगा अडथळा ठरायला लागला. मुलानं वडीलांना जाब विचारला. त्यामुळं चिडलेल्या बापानं मुलाचा गळा आवळून त्याचा खून केला. नात्याला काळिमा फासणारी ही घटना बिहारमध्ये घडली. मुलाचा खून केल्यानंतर या क्रूर बापानं मुलगा हरविल्याची तक्रार करून, अन्य लोकांवर अपहरणाचा आरोप केला. बिहारमधील सचिन नावाचा तरुण नोकरीनिमित्त गुजरातमध्ये होता. त्याची पत्नी …
 

पाटणा : मुलीसमान असलेल्या सुनेशी अनैतिक संबंधात मुलगा अडथळा ठरायला लागला. मुलानं वडीलांना जाब विचारला. त्यामुळं चिडलेल्या बापानं मुलाचा गळा आवळून त्याचा खून केला. नात्याला काळिमा फासणारी ही घटना बिहारमध्ये घडली. मुलाचा खून केल्यानंतर या क्रूर बापानं मुलगा हरविल्याची तक्रार करून, अन्य लोकांवर अपहरणाचा आरोप केला.

बिहारमधील सचिन नावाचा तरुण नोकरीनिमित्त गुजरातमध्ये होता. त्याची पत्नी आणि वडील मिथिलेश रवीदास हे बिहारमधील त्यांच्या मूळगावीच राहत होते. मुलगा घरात नसल्यानं बापानं सुनेशीच सूत जुळविलं. सूनही नवऱ्याची उणीव सासऱ्याकडून भरून काढायला लागली. गुजरातमध्ये असताना सचिनला वडील आणि पत्नीच्या उद्योगाची कुणकुण लागली. त्याची शहानिशा करण्यासाठी तो मूळ गावी आला. सचिननं वडिलांना अनैतिक संबंधांचा जाब विचारला. त्यावरुन दोघांमध्ये भांडण झालं.

मिथिलेशने आपल्याच मुलाला संपविलं. त्याचा मृतदेह पाटण्यातील एका बागेत लपवला. वर मुलगा हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. आपल्या मुलाचं अपहरण पाच जणांनी अपरहण केल्याचा आरोप करीत संशयितांची नावंही दिली. सचिनचा मृतदेह पोलिसांना दोन दिवसांनी आढळला. पोलिसांच्या तपासात सासरा आणि सुनेच्या संबंधांची माहिती मिळाली. त्यानंतर मिथिलेशनं हत्येची कबुली दिली.