सासरच्या मंडळींना विष देऊन विवाहिता प्रियकरासोबत फरार

नऊ जण आढळले बेशुद्ध; नणंदेच्या नवर्यासोबतच होते अफेअरभोपाळ : प्रेमात बुडालेली व्यक्ती इरेला पेटली तर प्रेम मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. मध्य प्रदेशात भिंड जिल्ह्यात अशीच एक भयंकर घटना उघडकीस आली आहे.तेथे एका घरातील विवाहिता सासरच्या मंडळींना जेवणातून विष देऊन प्रियकरासोबत फरार झाली आहे. तिचा प्रियकर हादेखील तिच्या नणंदेचा नवराच आहे, हे विशेष. सासरच्या मंडळींना …
 

नऊ जण आढळले बेशुद्ध; नणंदेच्या नवर्‍यासोबतच होते अफेअर
भोपाळ :
प्रेमात बुडालेली व्यक्ती इरेला पेटली तर प्रेम मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. मध्य प्रदेशात भिंड जिल्ह्यात अशीच एक भयंकर घटना उघडकीस आली आहे.तेथे एका घरातील विवाहिता सासरच्या मंडळींना जेवणातून विष देऊन प्रियकरासोबत फरार झाली आहे. तिचा प्रियकर हादेखील तिच्या नणंदेचा नवराच आहे, हे विशेष. सासरच्या मंडळींना बेशुद्धावस्थेत इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. तर पोलीस त्या प्रेमी जोडप्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, भिंड जिल्ह्यात समार गावात रेश्मा नावाच्या एका विवाहितेच्या पतीचे निधन झाले आहे. त्यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा विवाह पतीच्या लहान भावाशी लावून दिला. पण त्यानंतरही रेश्मा संसारात समाधानी नव्हती. तिला तिच्या नणंदेचा नवरा आवडला. त्याचेही तिच्यावर मन जडले. पण सासरच्या मंडळींच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी या दोघांच्या संबंधांना विरोध केला. तरीही दोघांचे प्रेम अधिक घट्ट झाल्यानंतर त्या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. जाण्याआधी रेश्माने सासरच्या मंडळींना अन्नातून विष दिले शेजार्‍यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी बेशुद्धावस्थेतील सासरच्या मंडळींना रुग्णालयात दाखल केले.