शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर राजस्थानात हल्ला

गाडीच्या काचा फुटल्या; भाजपवर हल्ल्याचा आरोप; चौघांना अटक अलवर : तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलनाचे रण पेटविणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शुक्रवारी राजस्थानात एका प्रचारसभेला जाताना दगडफेक झाली. त्यात टिवैâत यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या. या हल्ल्यात टिवैâत हे थोडक्यात बचावले. हा हल्ला भाजपनेच करवून आणला असल्याचा आरोप राकेश टिवैâत यांच्यासह भारतीय किसान युनियनने केला आहे. …
 

गाडीच्या काचा फुटल्या; भाजपवर हल्ल्याचा आरोप; चौघांना अटक

अलवर : तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलनाचे रण पेटविणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शुक्रवारी राजस्थानात एका प्रचारसभेला जाताना दगडफेक झाली. त्यात टिवैâत यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या. या हल्ल्यात टिवैâत हे थोडक्यात बचावले. हा हल्ला भाजपनेच करवून आणला असल्याचा आरोप राकेश टिवैâत यांच्यासह भारतीय किसान युनियनने केला आहे. आम्ही अशा हल्ल्यांना व धमक्यांना घाबरत नाही, असा इशाराही टिवैâत यांनी दिला आहे. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी चार लोकांना ताब्यात घेतले आहे.

केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांविराधोत जनजागरण व विरोध प्रदर्शन सुरूच आहे. राकेश टिवैâत व इतर शेतकरी नेते विविध राज्यांत गावोगाव महापंचायत घेऊन कृषी कायद्यांविरोधात जनजागृती करत आहेत. राकेश टिकौत यांची शुक्रवारी राजस्थानात अलवर येथे महापंचायत होणार होती. त्यासाठी ते ततारपूर चौकातील सभास्थळी जात होते. पण अचानक काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारच्या दिशेने दगडफेक सुरू केली. दगडफेकीत टिवैâत व त्यांच्या सहकार्‍यांना काहीही झाले नाही. सुरक्षा रक्षकांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. पण त्यांच्या गाडीच्या काही काचा मात्र फुटल्या.भारतीय किसान युनियनने या हल्लाप्रकरणी भाजपवर आरोप केला आहे.हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. हल्ला करणारा कुलदीप यादव हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांचा निकटवर्तीय आहे. पण आम्ही अशा हल्ल्यांना घाबरत नाही. पोलिसांनी याप्रकरणी चार व्यक्तींना अटक केली आहे.