शरीरसंबंध न ठेवणार्या पतीविरोधात पत्नीची ठाण्यात धाव
कारवाई काय करावी? पोलिसांनाही पडला प्रश्न
अहमदााबाद : कोणत्या कारणासाठी लोक पोलीस ठाण्यात धाव घेतील आणि तक्रार करतील याचा काही नेम नसतो. गुजरातमध्ये अशीच एक तक्रार घेऊन पीडिता ठाण्यात आली. पण तिच्या त्या नाजूक तक्रारीवर कारवाई काय करावी? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. गुजरातमधील अहमदाबाद शहरातील एका ३४वर्षीय विवाहित महिलेने ठाण्यात अशी तक्रार दिली की, तिच्या पत्नी गेल्या वर्षभरापासून तिच्याशी शारिरीक संबंधच ठेवले नाहीत. शिवाय आपल्या दोन वर्षे वयाच्या मुलीला बिअर पिण्यासाठी तो जबरदस्ती करत असल्याचा आरोपही तिने केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदाबाद शहरात गोटा परिसरातील एका महिलेने अडलाज पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, तिचा पती एनआरआर आहे. त्याच्याशी तिचे सहा वर्षांपूर्वी २०१६मध्ये लग्न झाले होते.तिचा पती दुईत राहतो. त्याला दारूचे व्यसन आहे. पण तो घरी आल्यावरही चिक्कार दारू पितो, दारूच्या रिकाम्या बाटल्या मुलीला खेळण्यासाठी देतो. इतकेच नव्हे तर दोन वर्षाच्या लहान मुलीला बिअर पिण्याचा आग्रह धरतो.त्याला मी विरोध केल्यानंतर मला त्याने मारहाण केली. २०१७ मध्ये मी त्याच्यासोबत दुबईला गेल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींच्या चिथावणीवरून त्याने तिला मारहाण केली.दारू पिऊन गोंधळ घातला. माहेरहून पैसे आणण्यासाठी भांडण करू लागला. मला बिअर आवडत नाही. तरीही तो पिण्यासाठी आग्रह धरायचा, मला सतत टोमणे मारायचा. गेल्या वर्षभरापासून त्याने माझ्याशी शारिरीक संबंध ठेवले नाहीत. मार्चमध्ये आम्ही सगळे भारतात आलो. पण काही दिवसांनी तो मला व माझ्या मुलीला सोडून निघून गेला आहे. त्यांचा शोध घेऊन आपल्याला रीतसर न्याय मिळवून ्द्यावा, अशी मागणी सदर महिलेने केली आहे. एनआरआय पती व सासरच्या मंडळींविरोधात रितसर तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीआधारे पोलीस या कौटुंबिक प्रकरणाचा तपास करत आहेत.