शरद पवार- अमित शहांना भेटल्याची चर्चा

राज्यात नव्या राजकीय घडामोडी घडणार? बड्या नेत्याचा दावामुंंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे सर्वपक्षीय मित्र म्हणून ओळखले जातात.सत्तापक्षातही त्यांचे अनेक मित्र आहेत. पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपचे त्यांचे संबंध बर्यापैकी ताणले गेले आहेत. तरीही भाजपशी त्यांचे सख्य कायम असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेलं नसल्याची चर्चा …
 

राज्यात नव्या राजकीय घडामोडी घडणार? बड्या नेत्याचा दावा
मुंंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे सर्वपक्षीय मित्र म्हणून ओळखले जातात.सत्तापक्षातही त्यांचे अनेक मित्र आहेत. पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपचे त्यांचे संबंध बर्‍यापैकी ताणले गेले आहेत. तरीही भाजपशी त्यांचे सख्य कायम असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेलं नसल्याची चर्चा असतानाच शरद पवार यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. गुजरातमधील एका दैनिकाने या दोन नेत्यांची भेट झाल्याचा दावा केला आहे. या वृत्तामुळे राजकीय निरीक्षकांच्या भूवया पुन्हा एकदा उंचावल्या गेल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र शरद पवार आणि अमित शहा यांच्या कोणत्याही प्रकारची भेट झाली नसल्याचे सांगत हा दावा फेटाळून लावला आहे. परंतु दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार अमित शहा आणि पवार यांची अहमदाबादमधील एका फार्महाऊसवर गुप्त भेट झाली. याभेटीसाठी पवारांनी खासगी जेट विमानचा वापर केला होता. या विमानाने ते अहमदाबादला गेले आणि शहा यांना भेटून मुंबईला परतल्याचा दावा करण्यात आला आहे. पण नवाब मलिक यांनी या दोन नेत्यांची भेट झाली नाही.हे भाजपचेच षडयंत्र आहे. प्रफुल्ल पटेल व शरद पवार अहमदाबादहून थेट मुंबईला आले, असे मलिक म्हणाले. दरम्यान सूत्रांच्या म्हणण्यानुसार २६मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता प्रफुल्ल पटेल यांची भाजपच्या एका बड्या उद्योगपतीची भेट झाली. या भेटीवेळी पवारहेदखील उपस्थित होते. या भेटीमुळे महाराष्ट्रतील महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.