वेळेवर नाश्ता दिला नाही म्हणून घेतला पत्नीचा जीव

कोल्लम : रागाचा पारा चढल्यानंतर व्यक्तीला क्षुल्लक कारणही मोठे वाटायला लागते.त्यामुळे रागाच्या भरात माणूस कोणत्या थराला जाईल काही सांगता येत नाही.केरळमध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. केरळच्या कोल्लम जिल्ह्यात पत्नीने वेळेवर नाश्ता करून दिला नाही म्हणून संतापलेल्या नवरोबाने जबर मारहाण करून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक बाब घडली आहे.कोल्लम जिल्ह्यात मवाडी येथे राहणारा ६३ वर्षीय …
 

कोल्लम : रागाचा पारा चढल्यानंतर व्यक्तीला क्षुल्लक कारणही मोठे वाटायला लागते.त्यामुळे रागाच्या भरात माणूस कोणत्या थराला जाईल काही सांगता येत नाही.केरळमध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. केरळच्या कोल्लम जिल्ह्यात पत्नीने वेळेवर नाश्ता करून दिला नाही म्हणून संतापलेल्या नवरोबाने जबर मारहाण करून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक बाब घडली आहे.कोल्लम जिल्ह्यात मवाडी येथे राहणारा ६३ वर्षीय वृद्ध व त्याची ५८ वर्षीय पत्नी सुशीला शेतात काम करत होते. शेतातून परतल्यानंतर पतीला भूक लागल्याने त्याने पत्नीला नाश्ता बनविण्याचे फर्मान सोडले. पत्नीने नाश्ता करून आणला. पण तिला थोडा उशीर झाला. त्यामुळे त्या दोघांमध्ये भांडण पेटले. भांडण वाढत गेल्याने पतीचा राग अनावर झाला. रागाच्या भरात पतीने सुशीलाला जबर मारहाण केली. त्यात तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली. पोलिसांनी तिला रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचार सुरू असताना तिथे त्याचा मृत्यू झाला.यानंतर पोलिसांनी पतीला हत्येच्या आरोपात अटक केली आहे.