वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लग्नाच्या बेडीत

टीव्ही अँकर संजना गणेशनसोबत घेतले सात फेरे मुंबई : दिग्गज फलंदाजांच्या उरात धडकी भरवणारा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अखेर लग्नाच्या बंधनात अडकला आहे.त्याने टीव्ही अँकर संजना गणेशन हिला जीवनसाथी म्हणून निवडले असून ते दोघे गोव्यात एका खास समारंभात विवाहबद्ध झाले. कोरोनामुळे सर्व नियम पाळून मोजक्या निमंत्रित मंडळींच्या साक्षीने हा विवाहसोहळा पार पडला. इंग्लंडसोबत …
 

टीव्ही अँकर संजना गणेशनसोबत घेतले सात फेरे

मुंबई : दिग्गज फलंदाजांच्या उरात धडकी भरवणारा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अखेर लग्नाच्या बंधनात अडकला आहे.त्याने टीव्ही अँकर संजना गणेशन हिला जीवनसाथी म्हणून निवडले असून ते दोघे गोव्यात एका खास समारंभात विवाहबद्ध झाले. कोरोनामुळे सर्व नियम पाळून मोजक्या निमंत्रित मंडळींच्या साक्षीने हा विवाहसोहळा पार पडला. इंग्लंडसोबत टीम इंडिया संघातील क्रिकेटपटू त्यात सहभागी होऊ शकले नाहीत. जसप्रीत बुमराहने काही दिवसांपूर्वी विवाहानिमित्त नैमित्तिक सुटी घेतली होती. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याचा समावेश करण्यात आलेला नव्हता. बुमराह आणि संजना गणेशन हे गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेटिंग करत होते. विविध स्पर्धांचे अँकरिंग करणार्‍या संजना गणेशन व बुमराह यांची ओळख आयपीएलदरम्यान वाढली व त्याचे प्रेमात रुपांतर झाले. त्यामुळे त्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. या नवीन जोडप्यास अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.