विद्यार्थिनीचे कारमधून अपहरण; घरात डांबून 5 दिवस बलात्कार

कानपूर (महाराष्ट्र न्यूज लाइव्ह वृत्तसेवा) ः बाजारातून घरी परतणार्या विद्यार्थिनीचे कारमधून अपहरण करत तिच्यावर बंद खोलीत सलग पाच दिवस बलात्कार केल्याची घटना उत्तरप्रदेश राज्यातील कानपूर शहरात समोर आली आहे. याप्रकरणी बिधनू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी नराधमाला अटक करण्यात आली आहे. सागर राजपूत (रा.आझादनगर, कानपूर) असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे. बिधनू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझादनगर भागात …
 

कानपूर (महाराष्ट्र न्‍यूज लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बाजारातून घरी परतणार्‍या विद्यार्थिनीचे कारमधून अपहरण करत तिच्यावर बंद खोलीत सलग पाच दिवस बलात्कार केल्याची घटना उत्तरप्रदेश राज्यातील कानपूर शहरात समोर आली आहे. याप्रकरणी बिधनू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी नराधमाला अटक करण्यात आली आहे.

सागर राजपूत (रा.आझादनगर, कानपूर) असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे. बिधनू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझादनगर भागात एक मोलमजुरी करणारे कुटुंब राहते. या कुटुंबातील मुलगी कानपूरमध्ये एका महाविद्यालयात १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. बुधवारी (दि.३) ती सामान आणण्यासाठी बाजारात गेली होती. तेथून घरी परतत असताना सागरने रस्त्यात तिच्याजवळ कार उभी केली. मी तुला घरी सोडतो, असे आमिष दाखवून त्याने तिला बळजबरीने कारमध्ये बसवले. तो घराशेजारीच राहणारा असल्याने तिच्या मनात कोणतीही शंका आली नाही. परंतु वाईट नजर असलेल्या सागरने गाडीतून तिचे  अपहरण केले. अज्ञातस्थळी नेऊन तिला एका खोलीत डांबून ठेवले. याठिकाणी तिला धमकावून सतत पाच दिवस त्याने बलात्कार केला. इकडे घरातील लोक, नातेवाईक तिचा सर्वत्र शोध घेत होते. नंतर आरोपी तिला घरासमोर सोडून पसार झाला. सोमवारी रात्री मुलगी बेशुद्ध अवस्थेत घरासमोर तिच्या वडिलांना दिसली. तिची ही अवस्था पाहून कुटुंबियांच्या पायाखालची वाळू घसरली. सकाळी या प्रकारातून सावरल्यानंतर नातेवाइकांसह पीडितेने पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. याप्रकरणी अपहरण, बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.