लीव्ह इन पार्टनरची पोलिस निरीक्षकानंच केली हत्या

अहमदाबाद ः कायदा रक्षणाची ज्याची जबाबदारी असते, त्यानेच कायदा हातात घेऊन लीव्ह इन पार्टनरची हत्या करण्याचा प्रकार बडोद्यात घडला. बडोदा ग्रामीणमध्ये नियुक्तीस असलेल्या आरोपीचं नावं अजय देसाई आहे. पोलिस निरीक्षक असलेल्या अजयने त्याच्यासोबत लीव्ह इनमध्ये राहणाऱ्या स्वीटी पटेल हिची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावली. या कामात त्याला त्याच्या मित्राची मदत झाली. अजयसोबत राहणारी स्वीटी पटेल …
 

अहमदाबाद ः कायदा रक्षणाची ज्याची जबाबदारी असते, त्यानेच कायदा हातात घेऊन लीव्ह इन पार्टनरची हत्या करण्याचा प्रकार बडोद्यात घडला. बडोदा ग्रामीणमध्ये नियुक्तीस असलेल्या आरोपीचं नावं अजय देसाई आहे. पोलिस निरीक्षक असलेल्या अजयने त्याच्यासोबत लीव्ह इनमध्ये राहणाऱ्या स्वीटी पटेल हिची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावली. या कामात त्याला त्याच्या मित्राची मदत झाली.

अजयसोबत राहणारी स्वीटी पटेल बेपत्ता होती. तिच्या बेपत्ता होण्याचा तपास बडोदा पोलिस लावू शकले नाहीत. नंतर गृह राज्यमंत्री प्रदीप सिंह जाडेजा यांनी बडोदा पोलिसांकडून तपास काढून घेतला. अहमदाबाद क्राईम बँचकडे तपास सोपविण्यात आला. गुजरात एटीएसचे या तपासावर नियंत्रण होते. स्वीटी घरगुती वादामुळे घर सोडून निघून गेल्याचा कांगावा अजय देसाईन यानं केला. आमच्या दोन वर्षांच्या मुलाची तुम्ही देखभाल करा, असं त्यानं तिच्या भावाला सांगितलं. अजय आणि स्वीटीमध्ये जोरदार भांडण झालं होतं.

या भांडणाला अजयचं दुसरं लग्न हे कारण होतं. भांडण इतकं विकोपला गेलं, की अजयनं तिचा गळा दाबला. त्यात तिचा जी गेला. स्वीटीचा मृतदेह चादरीत गुंडाळला. तो कारमध्ये ठेवला. त्यानं तिच्या भावाला स्वीटी बेपत्ता असल्याचं फोनवर सांगितलं. त्यानंतर अजय कार घेऊन मित्र किरीट सिंग जाडेजा याच्या हॉटेलवर पोहोचला. तिथंच तिचा मृतदेह जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अजयचं आधी एक लग्न झालं होतं; पण त्यानं घटस्फोट घेतला. त्यानंतर तो स्वीटी पटेलच्या संपर्कात आला. स्वीटीसोबत लीव्ह इनमध्ये राहत असतानाच त्यानं दुसऱ्यांदा आणखी एका महिलेशी लग्न गेलं.