राष्ट्रीय बातमी : …म्हणे मला भगवान शंकराची प्रेरणा; घरात केला “भलताच’ कारनामा!

बंगळुरू : मला भगवान शंकराची प्रेरणा आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, असा दावा करत एका एमबीए झालेल्या तरुणाने चक्क घरातच गांजा आणि भांगेची शेती सुरू केली. बंगळुरूच्या बिदादी परिसरातील एका बंगल्यात हा प्रकार समोर आला आहे. जवाद रोस्तमपूर असे या ३० वर्षीय तरुणाचे नाव असून, तो मूळचा इराणी नागरिक आहे. २०१० मध्ये तो शिक्षणासाठी भारतात …
 
राष्ट्रीय बातमी : …म्हणे मला भगवान शंकराची प्रेरणा; घरात केला “भलताच’ कारनामा!

बंगळुरू : मला भगवान शंकराची प्रेरणा आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, असा दावा करत एका एमबीए झालेल्या तरुणाने चक्क घरातच गांजा आणि भांगेची शेती सुरू केली. बंगळुरूच्या बिदादी परिसरातील एका बंगल्यात हा प्रकार समोर आला आहे. जवाद रोस्तमपूर असे या ३० वर्षीय तरुणाचे नाव असून, तो मूळचा इराणी नागरिक आहे. २०१० मध्ये तो शिक्षणासाठी भारतात आला होता.

जवादान हायड्रोपोनिक तंत्राचा वापर करून भांगेची शेती केली. भगवान शंकरामुळे आपल्याला ही प्रेरणा मिळाली असल्याचे गजब कारण त्याने पोलिसांना सांगितले. भांगेची शेती करण्यासाठी ६ महिने त्याने त्याचा अभ्यास केला. उत्पादन कसं घ्यायचं, बियाणे कुठून आणायचे, पिकाची काळजी कशी घ्यायची याचा ऑनलाइन अभ्यास त्याने केला. युरोपातून डार्क वेबच्या माध्यमातून ६० बियाणे आणली. घरातल्या फिश टँकमध्ये बियाणांची लागवड केली. घरच्या घरी त्यांना गांजाचे व भांगेचे उत्पादन घेतले. त्याच्या घरातून १३० रोपटे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जप्त करून अटक केली आहे.