राष्ट्रीय बातमी : डॉक्टरचा महिला कॉन्‍स्‍टेबलवर लैंगिक अत्याचार; गुंगीचे औषध देऊन कृत्‍य

लखनौ : उपचारासाठी आलेल्या महिला कॉन्स्टेबलला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उत्तरप्रदेशातील लखनौ येथे समोर आली आहे. याप्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. पीडित महिला पोलीस कर्मचारी स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या धीरज शर्मा या डॉक्टरकडे २४ सप्टेंबर रोजी उपचारासाठी गेली होती. आरोपी डॉक्टर तेव्हा दारूच्या नशेत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. …
 
राष्ट्रीय बातमी : डॉक्टरचा महिला कॉन्‍स्‍टेबलवर लैंगिक अत्याचार; गुंगीचे औषध देऊन कृत्‍य

लखनौ : उपचारासाठी आलेल्या महिला कॉन्स्टेबलला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उत्तरप्रदेशातील लखनौ येथे समोर आली आहे. याप्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.

पीडित महिला पोलीस कर्मचारी स्त्रीरोग तज्‍ज्ञ असलेल्या धीरज शर्मा या डॉक्टरकडे २४ सप्टेंबर रोजी उपचारासाठी गेली होती. आरोपी डॉक्टर तेव्हा दारूच्या नशेत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. तुझ्या आजारामुळे तुला स्पेशल उपचाराची गरज आहे. ते उपचार केवळ माझ्याकडेच आहेत, असे म्हणून डॉक्टरने तिला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर बळजबरी लैंगिक अत्याचार केला. शुद्धीवर आल्यावर आपल्यासोबत नको ते झाल्याचे तिच्या लक्षात आल्याने तिने पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.