राष्ट्रीय बातमी : कोलकाता हायकोर्ट म्‍हणते, १६ वर्षांची मुलगी सहमतीने संबंध ठेवत असेल तर “पाेस्को’अंतर्गत गुन्हा नाहीच!

कोलकाता : अल्पवयीन मुलीशी तिच्या सहमतीने शरीसंबंध ठेवणे “पाेस्को’ कायद्याअंतर्गत गुन्हा होऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा कोलकाता हायकोर्टाने दिला आहे. एखादी १६ वर्षांची मुलगी जर पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवत असेल तर ती अज्ञानी आहे, असे समजता येणार नाही. तिला होणाऱ्या परिणामांची पूर्ण जाणीव असतेच, असे न्यायालयाने म्हटले आहे. एका प्रकरणाची सुनावणी करताना “पोस्को’ कायद्याअंतर्गत …
 
राष्ट्रीय बातमी : कोलकाता हायकोर्ट म्‍हणते, १६ वर्षांची मुलगी सहमतीने संबंध ठेवत असेल तर “पाेस्को’अंतर्गत गुन्हा नाहीच!

कोलकाता : अल्पवयीन मुलीशी तिच्या सहमतीने शरीसंबंध ठेवणे “पाेस्को’ कायद्याअंतर्गत गुन्हा होऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा कोलकाता हायकोर्टाने दिला आहे.

एखादी १६ वर्षांची मुलगी जर पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवत असेल तर ती अज्ञानी आहे, असे समजता येणार नाही. तिला होणाऱ्या परिणामांची पूर्ण जाणीव असतेच, असे न्यायालयाने म्हटले आहे. एका प्रकरणाची सुनावणी करताना “पोस्को’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीची न्‍यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. २०१७ मध्ये एका २२ वर्षीय तरुणाने १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र तरुणाने मुलीशी सहमतीने शारीरिक संबंध ठेवले असल्याचे कोर्टात सिद्ध झाले. त्यामुळे केवळ तरुणाला दोषी मानता येणार नाही, असे न्‍यायालय म्‍हणाले.